औरंगाबाद विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, अनेक मंत्र्यांची फोनाफोनी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 10:00 PM2017-11-22T22:00:13+5:302017-11-22T22:01:43+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि. २४) मतदान होत आहे. या मतदानात एक-एक मत महात्वाचे असल्यामुळे थेट विधिमंडळातील दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, भाजपाचे प्रदेशाध्यक्षसह मंत्र्यांनी फोनाफोनी सुरु केली आहे.

In the elections held by the Aurangabad University, the prestige of the political leaders has increased, many ministers' Phonaphoni | औरंगाबाद विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, अनेक मंत्र्यांची फोनाफोनी

औरंगाबाद विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, अनेक मंत्र्यांची फोनाफोनी

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि. २४) मतदान होत आहे. या मतदानात एक-एक मत महात्वाचे असल्यामुळे थेट विधिमंडळातील दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, भाजपाचे प्रदेशाध्यक्षसह मंत्र्यांनी फोनाफोनी सुरु केली आहे. आपल्या समर्थकाला मत देण्यासाठी मतदारांना विनंती करण्यात येत आहे. 
विद्यापीठाच्या अधिसभेतील महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यापीठ प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक आणि विद्यापरिषदेसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. चार जिल्ह्यात मतदार असल्यामुळे उत्कर्ष पॅनल, विद्यापीठ विकास मंच आणि बामुक्टो संघटनेच्या उमेदवारांनी सर्व महाविद्यालयांना भेटी देत मतदान देण्याची मागणी केली आहे. मात्र आता शेवटच्या टप्प्यात सर्व प्रचार फोनाफोनी आणि बैठकांद्वारे करण्यात येत आहे. संस्थाचालक गटातुन निवडणूक लढवत असलेले भाऊसाहेब राजळे यांच्यासाठी थेट विधासभेसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही संस्थाचालक मतदारांना फोन करुन सहकार्य करण्याचे आवाहन केल्याचे समजते. तर  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उत्कर्ष पॅनलमध्ये आपल्या दोन समर्थकांना उमेदवारी मिळवून दिली आहे. यामुळे ते सुद्धा या निवडणुकीकडे बारकाईने लक्ष देऊन आहेत. उत्कर्ष पॅनलचा किल्ला आमदार सतीश चव्हाण एकहाती लढवत आहेत. सर्व नियोजन त्यांच्या कार्यालयातूनच चालते. तर काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार विक्रम काळे, आमदार अमरसिंह पंडित, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार कल्याण काळे यांच्यासह इतर दिग्गज राजकीय नेत्यांनी उत्कर्ष पॅनलला पाठबळ दिले आहे. याशिवाय उत्कर्ष पॅनलमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्यांना उमेदवारी देण्यात आलेली असल्याचे सर्वांचाच पाठिंबा मिळाला असल्याचा दावा उत्कर्षचे उमेदवार डॉ. राजेश करपे यांनी केला. विद्यापीठ विकास मंचसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेत बैठक घेतली असल्याचे मंचचे निमंत्रक डॉ. गजानन सानप यांनी सांगितले. याशिवाय उत्कर्ष पॅनलच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे आमदार चार मते असलेल्या महाविद्यालयातही प्रचारासाठी जात आहेत. त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसून आल्यामुळे उत्कर्ष पॅनलवाल्यांना पळताभूई थोडी झाली आहे. या निवडणूकीत विद्यापीठ विकास मंच बहुमताने विजयी होणार असल्याचा दावाही डॉ. सानप  यांनी केला.  डॉ. सानप यांच्या आरोपांविषयी उत्कर्ष पॅनलचे डॉ. राजेश करपे यांना विचारले असता, त्यांनी डॉ. सानप यांना महाविद्यालयात गेल्यानंतर स्वत:ची ओळख करुन द्यावी लागते. तसे आमदारांचे नाही. त्यांना मनणारा, ओळखणारा एक वर्ग आहे. आमदारांचे पाय जमिनीवर असल्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी जात असल्याचे स्पष्टीकरण दिले. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर यांनी पहिल्यांदाच स्वंतत्र भूमिका घेत विद्यापीठ विकास मंचकडून संस्थेचे तीन उमेदवार दिले आहे. या उमेदवारांना मत देण्यासाठी स्वत: जयदत्त क्षीरसागर प्रयत्नशिल असल्याचे समजते. शिक्षक आणि विद्यापरिषद गटात निवडणूक लढवत असलेल्या बामुक्टोचा एकच ध्यास आहे. प्राध्यापक संघटना जगली पाहिजे, टिकली पाहिजे आणि वाढली पाहिजे. प्राध्यापकांचे प्रश्र केवळ संघटनाच सोडवू शकते. यासाठी निवडणूकीत जोरदारपणे उतरलो असल्याचे बामुक्टोच उमेदवार डॉ. विक्रम खिलारे यांनी सांगितले.

कोणाला पळताभुई झाली आणि कोणात कीती दम आहे हे २६ तारखेला कळेल. त्यापुर्वी बोलण्यात किंवा कोणाला महत्व देण्यात काय उपयोग? उत्कर्षकडे प्राध्यापक गटात २७०० पेक्षा अधिक मतदार आहेत. संस्थाचालक गटात तीन उमेदवार दिले ते सर्व निवडूण येतील. प्राचार्यतही हीच स्थिती आहे. एक-दोन अपवाद वगळता उत्कर्ष पॅनल सर्व जागा जिंकेल.
- सतीश चव्हाण, आमदार, मराठवाडा पदवीधर मतदार संघ

आतापर्यत निवडणूक एकतर्फी होत असे. यावेळी आम्ही प्रबळ विरोधक म्हणून उभे ठाकलो. लोकांना बदल हवा आहे. त्यासाठी सक्षम पर्याय निर्माण झाला आहे. जालना, बीड जिल्ह्यातील प्रस्थापित मंडळी सूद्धा आमच्यासोबत असल्यामुळे विजय निश्चित आहे.
- डॉ. गजानन सानप, निमंत्रक, विद्यापीठ विकास मंच

Web Title: In the elections held by the Aurangabad University, the prestige of the political leaders has increased, many ministers' Phonaphoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.