विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनलचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 04:03 PM2018-06-15T16:03:42+5:302018-06-15T16:05:34+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत ८ पैकी ६ जागा जिंकत आ. सतीश चव्हाण यांच्या उत्कर्ष पॅनलने वर्चस्व राखले.

In the elections of the University's management council utkarsh pannel domient | विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनलचे वर्चस्व

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनलचे वर्चस्व

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत ८ पैकी ६ जागा जिंकत आ. सतीश चव्हाण यांच्या उत्कर्ष पॅनलने वर्चस्व राखले.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या आठ जागांसाठी आज निवडणूक झाली. यातील आरक्षित चार जागा बिनविरोध निघाल्या होत्या. उर्वरित खुल्या गटातील चार जागांमधील दोन जागा बिनविरोध निघण्याची शक्यता होती. मात्र उत्कर्ष पॅनलमध्ये बंडखोरी झाल्यामुळे एकही जागा बिनविरोध निघाली नाही. यामुळे आज खुल्या गटातील जागेवर कोण निवडून येणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती.

पदवीधर गटात डॉ. नरेंद्र काळे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज डॉ. संभाजी भोसले यांनी उमेदवारी कायम ठेवली होती. यात डॉ. काळे यांनी विजय मिळवला. संस्थाचालक गटात माजी मंत्री राजेश टोपे यांच्या पत्नीला बिनविरोध निवडून आणण्यासाठी पडद्याआड जोरदार हालचाली झाल्या. मात्र अपक्ष भाऊसाहेब राजळे आणि संजय निंबाळकर यांनी टोपे यांच्या हालचालींना खो घालत अर्ज कायम ठेवले. त्यामुळे मनीषा टोपे यांनी माघार घेतली. याच वेळी उत्कर्षतर्फे जालन्याचे कपिल आकात यांचा अर्ज कायम राहिल्यामुळे तिहेरी लढत झाली, यात विद्यापीठ विकास मंचाच्या संजय निंबाळकर यांनी बाजी मारली.

तर प्राचार्य गटात प्राचार्य गटात डॉ. हरिदास विधाते (बिनविरोध ओबीसी गट), प्राध्यापक गटात उत्कर्षचे डॉ. राजेश करपे हे विजयी झाले.

संपूर्ण निकाल खालील प्रमाणे :

- उत्कर्षचे विजयी उमेदवार
1.प्राचार्य डॉ .जयसिंग देशमुख
(प्राचार्य गट)
2.डाॅ.राजेश करपे (अध्यापक गट)
3.डाॅ.नरेंद्र काळे(पदवीधर गट)
4.राहूल म्हस्के(बिनविरोध-
राखीव- व्यवस्थापन )
5.सुनील निकम(बिनविरोध-राखीव पदवीधर )
6.डाॅ.फुलचंद सलामपुरे (बिनविरोध-राखीव प्राध्यापक गट)

- विद्यापीठ विकास मंचतर्फे
1) प्राचार्य गटात डॉ. हरिदास विधाते (बिनविरोध ओबीसी गट)
2) संजय निंबाळकर (संस्थाचालक गट)

Web Title: In the elections of the University's management council utkarsh pannel domient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.