नव वर्षात हा बदल होणार, रिचार्ज केल्यानंतरच मिळेल वीज; पैसा संपताच बत्ती होणार गुल !
By साहेबराव हिवराळे | Published: December 28, 2023 06:20 PM2023-12-28T18:20:22+5:302023-12-28T18:21:10+5:30
देशभरात कुठेही तुम्ही राहत असलात तरी येत्या वर्षभरापासून तुम्हाला विजेच्या वापरासाठी आधी पैसे मोजावे लागणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर : थकबाकीला आवर घालण्यासाठी महावितरण आता स्मार्ट मीटर घेऊन येणार आहे. रिचार्ज केल्यानंतरच वीज मिळणार आहे. मोबाईलप्रमाणे पैसे संपले की वीज गुल होईल. त्यामुळे अतिवीज वापरावर चाप बसणार आहे. वीज चोरीच्या घटनांना ब्रेक लागणार आहे. थकबाकीमुळे वीज पुरवठा कट करून राजरोसपणे वीज जोडणी घेणाऱ्यांची संख्या अधिक बळावलेली आहे. यावर गुन्हे दाखल होऊनही कारवाईला न जुमानता वीज चोऱ्या केल्या जात असल्याने प्रीपेड मीटर त्यावर पर्याय असल्याचे हेरलेले आहे. प्रत्येक घरी प्रीपेड स्मार्ट मीटर लागणार आहेत.
पुढील वर्षापासून देशभर अनिवार्य ?
देशभरात कुठेही तुम्ही राहत असलात तरी येत्या वर्षभरापासून तुम्हाला विजेच्या वापरासाठी आधी पैसे मोजावे लागणार आहेत.
जिल्ह्यात घरगुती पाच लाख ग्राहक
विजेची बिले थकवणाऱ्यांना आणि विजेची चोरी करणाऱ्या ग्राहकांना चाप बसवण्यासाठी केंद्र सरकारने आता प्रीपेड म्हणजेच वीज वापरण्याआधीच पैसे भरावे लागतील अशी योजना आणली आहे.
जेवढा रिचार्ज तेवढी मिळेल वीज
येत्या वर्षभरापासून तुम्हाला विजेच्या वापरासाठी आधी पैसे मोजावे लागणार आहेत.जेवढे रिचार्ज असेल तेवढीच वीज तुम्हाला वापरता येणार आहे. त्यामुळे वीज चोरून वापरणाऱ्यांची मोठी अडचण होणार असून, स्मार्ट मीटर घेण्याशिवाय पर्याय राहणारच नाही.
मोबाईलप्रमाणेच रिचार्ज संपले की वीज गुल
देशभरातील सर्व विजेचे मीटर बदलून त्याऐवजी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. सर्व विद्युत वितरण कंपन्यांना हे स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जिल्ह्यात तीन कोटींवर थकबाकी
जिल्ह्यात थकबाकीदारांची लिस्ट मोठी असून, त्यातून बहुतांश वीज थकबाकीदाराकडून वसुली झालेली आहे.स्मार्ट मीटर आल्यावर त्याचा फायदा कंपनीला होणार असून, वीजचोराला चाप बसणार आहे.
कधीपासून लागणार प्रीपेड स्मार्ट मीटर?
कधी बसणार महावितरण स्मार्ट मीटर याची चर्चा जोरात सुरू असून, पुढील वर्षी ही प्रक्रिया सुरू होणार आहे, असे खात्रीलायकपणे सूत्राकडून सांगितले जात आहे.
प्रीपेड स्मार्ट वीज मीटरने वापर जपून होईल..
सर्व विद्युत वितरण कंपन्यांना हे स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे स्मार्ट मीटर नक्की आहेत तरी कसे, त्याचा ग्राहकांना काय फायदा, त्यामुळे विजेची बचत होणार का, पैसे संपले की लगेच विद्युतपुरवठा खंडित होणार का असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुढे आले आहेत.
- महावितरण अधिकारी