नाममात्र शुल्कात मिळणार वीजमीटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:13 AM2017-08-27T00:13:33+5:302017-08-27T00:13:33+5:30
दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील १०५०० लाभार्थ्यांना नाममात्र शुल्क आकारून वीजमीटर दिले जाणार आहेत. महावितरणकडून सध्या सर्वेक्षण सुरू असून योजनेअंतर्गत ३९ कोटींची कामे केली जाणार आहेत. योजनेमुळे अंधारातील गावे प्रकाशमय होणार आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील १०५०० लाभार्थ्यांना नाममात्र शुल्क आकारून वीजमीटर दिले जाणार आहेत. महावितरणकडून सध्या सर्वेक्षण सुरू असून योजनेअंतर्गत ३९ कोटींची कामे केली जाणार आहेत. योजनेमुळे अंधारातील गावे प्रकाशमय होणार आहेत.
सदर योजनेच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेत येणाºयांकडून नाममात्र शुल्क आकारून वीज मीटर दिले जाणार आहे. या योजनेमुळे मात्र गाव तांडावस्तीवर असलेला अंधार दूर होण्यास मदत होणार आहे. शिवाय योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणकडून सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती अभियंता शांतीलाल चौधरी यांनी दिली. या योजनेअंतर्गत ३९ कोटींची वीजेची कामे महावितरणकडून केली जाणार आहेत. ग्रामीण भागातील कृषी व अकृषिक ग्राहकांना वीजपुरवठा होत असलेल्या सामाईक वाहिनीच्या विलगीकरणाद्वारे ‘अकृषिक’ ग्राहकांना स्वतंत्र वाहिनीद्वारे चोवीस तास वीजपुरवठा करण्याचे शासनाने निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण - श्रेणीवर्धन - बळकटीकरणासह प्रणालीतील वीजहानीच्या योग्य मोजमापासाठी ऊर्जा अंकेक्षण करण्यात येणार असून त्यासाठी ग्राहक तसेच वीज वितरण रोहित्र व फिडर यावर योग्य क्षमतेचे मीटर बसविले जाणार आहेत.