आज बारा तास वीज बंद

By Admin | Published: June 6, 2014 12:52 AM2014-06-06T00:52:44+5:302014-06-06T01:12:08+5:30

औरंगाबाद : मागील महिनाभरापासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागांत चार ते पाच दिवस पाणीपुरवठा होत नाही.

Electricity shut for twelve hours today | आज बारा तास वीज बंद

आज बारा तास वीज बंद

googlenewsNext

औरंगाबाद : मागील महिनाभरापासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागांत चार ते पाच दिवस पाणीपुरवठा होत नाही. ही कृत्रिम पाणीटंचाई आणखी तीव्र करण्यात जीटीएल हातभार लावत आहे.
उद्या शुक्रवार, दि.६ जून रोजी सिडको परिसर वगळता अन्य शहरातील वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय जीटीएलने घेतला आहे. शहरातील १७४ फिडर बंद करण्यात येणार आहेत. यातील कटकटगेट, सुभेदारी व बजाजनगर फिडरवरील वीजपुरवठा सुमारे १० ते १२ तास बंद ठेवण्यात येणार
आहे.
पन्नालालनगर, जवाहर कॉलनी, भगवती कॉलनी, विश्वभारती कॉलनी, विष्णूनगर, मित्रनगर, श्रेयनगर, झांबड इस्टेट, उल्कानगरी, रवींद्रनगर, अरिहंतनगर, आकाशवाणी केंद्र, श्रीरामनगर, शिवशंकर कॉलनी, खिंवसरा पार्क, शहानगर, विवेकानंदपुरम, उस्मानपुरा, मित्रमंडळ हाऊसिंग सोसायटी, प्रतापनगर, ज्योतीनगर, दशमेशनगर, तापडियानगर, शहानूरवाडी, चाणक्यपुरी, दूध डेअरी परिसर, उस्मानपुरा, क्रांतीचौक, खोकडपुरा, रोकडिया हनुमान कॉलनी, बंजारा कॉलनी, लक्ष्मीनगर, शिवाजीनगर, ११, १२ व १३ वी योजना, आदित्यनगर, सूतगिरणी परिसर, आनंदनगर, भारतनगर, गुरुदत्तनगर, देवगिरी हिल्स, गणेशनगर.
११ केव्ही मिलिंद फिडरवरील छावणी, लक्ष्मीनगर, शांतीनगर, ख्रिस्तनगर, भगतसिंगनगर, नंदनवन कॉलनी, पेठेनगर, पडेगाव, मित्रनगर, सुभाषपेठ, मिलिंद कॉलेज, गुलमोहर कॉलनी, निजाम बंगला या सर्व परिसरात सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहरवासीयांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
कुठे होणार विद्युत पुरवठा खंडित
सेव्हन हिल परिसर, विद्यानिकेतन कॉलनी, इंदिरानगर (गल्ली नं. ३ ते ३०), सुराणानगर, जालना रोड, सुभाषचंद्र बोसनगर, शताब्दीनगर, पोलीस मेस, बाबर कॉलनी, एस. टी. कॉलनी, नेहरूनगर परिसर, कटकटगेट फिडरवरील नवजीवन कॉलनी, यादवनगर, एस. पी. आॅफिस, सिद्धार्थनगर, टी. व्ही. सेंटर चौक, रविनगर, सुभेदारी व वॉटर वॅक्स फिडरवरील सुभेदारी, वानखेडेनगर, मुजफ्फर कॉलनी, चाऊसनगर, एकतानगर, जटवाडा रोड, वाळूज परिसरातील बजाजनगर, मोहटादेवी परिसर, जयभवानीनगर परिसरात सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
जून महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरीही जीटीएलचे मान्सूनपूर्व काम अजूनही सुरूच आहे. उल्लेखनीय म्हणजे २ एप्रिलपासून जीटीएलने मान्सूनपूर्व देखभाल, दुरुस्तीची कामे हाती घेतली; पण तीन महिने उलटूनही देखभाल, दुरुस्ती सुरूच आहे. शहरवासीयांनी छुप्या भारनियमनाचा फटका उन्हाळाभर सहन केला. उद्या ६ जून रोजी ३३ केव्ही पन्नालालनगर उपकेंद्र, ११ केव्हीच्या ७ फिडरवर दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.

Web Title: Electricity shut for twelve hours today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.