पाणीटंचाईला विजेचा अडसर

By Admin | Published: May 29, 2014 12:39 AM2014-05-29T00:39:22+5:302014-05-29T00:51:31+5:30

भोकर : तालुक्यातील २२ गावांतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अधिग्रहण केले असले तरी यासाठी वीज असणे आवश्यक आहे़

Electricity for water scarcity | पाणीटंचाईला विजेचा अडसर

पाणीटंचाईला विजेचा अडसर

googlenewsNext

भोकर : तालुक्यातील २२ गावांतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अधिग्रहण केले असले तरी यासाठी वीज असणे आवश्यक आहे़ पण अनेक गावांत वीज येण्याची ताळमेळ नाही़ २४ तासांपैकी केवळ ५ ते ६ तास येणार्‍या विजेवर ग्रामस्थांना पाण्याचे नियोजन करावे लागते़ यावेळी मिळेल तेवढ्या पाण्यावर समाधान मानावे लागते़ भोकर तालुक्यातील २३ गावांत पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत़ यापैकी कामनगाव येथे दोन वेळा टँकरने पाणीपुरवठा होत आहे़ तर बाकी गावांत विहीर अथवा बोअर अधिग्रहण करण्यात आले आहे़ अधिग्रहण केलेल्या बोअरहून पाणीपुरवठा होण्यासाठी विजेची आवश्यकता असते़ पण वीज केव्हा येईल व किती वेळ राहील, याची शाश्वती नसते़ पाकी व पाकीतांडा येथे भीषण पाणीटंचाई असून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ पाकी येथील एका हातपंपावर येणार्‍या अल्प पाण्यासाठी महिला ताटकळत थांबतात़ दिवशी बु़ तांड्यावर तर केवळ कधीमधी वीज येते़ या येणार्‍या विजेच्या आधारावर ग्रामस्थ पाण्याची नव्हे, तर अंघोळ करण्याचीही वाट पाहतात़ सोमठाणा आबादी येथे विहीर अधिग्रहण केले आहे, यासही विजेची वाट पहावी लागते़ मोखंडीतांडा येथील विद्युत रोहित्र गत दीड महिन्यांपासून बंद आहे़ यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी सार्वजनिक बोअरचे पाणी मिळत नसल्याने ते इतरत्र पाण्यासाठी फिरत आहेत़ ३०० लोकसंख्या असलेल्या या तांड्यावर सिंगल फेज असल्याने लाईट चालू आहे़ पण दीड महिन्यापासून बोअर मात्र बंद आहे़ नसलपूर येथील अधिग्रहण केलेल्या बोअर सुद्धा विजेअभावी २४-२४ तास तास बंद असतो़ अन्य ठिकाणीही अशीच परिस्थिती आहे़ (वार्ताहर)

Web Title: Electricity for water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.