छत्रपती संभाजीनगर ते बदनापूरपर्यंत रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण पूर्ण; इंजिनची चाचणीही यशस्वी 

By संतोष हिरेमठ | Published: April 1, 2023 08:40 PM2023-04-01T20:40:35+5:302023-04-01T20:41:04+5:30

आगामी महिनाभरात जालन्यापर्यंतचे काम पूर्ण होईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Electrification of railway line from Chhatrapati Sambhajinagar to Badnapur completed; Engine test also successful | छत्रपती संभाजीनगर ते बदनापूरपर्यंत रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण पूर्ण; इंजिनची चाचणीही यशस्वी 

छत्रपती संभाजीनगर ते बदनापूरपर्यंत रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण पूर्ण; इंजिनची चाचणीही यशस्वी 

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते बदनापूरपर्यंत रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे धावण्याची चाचणीही यशस्वी झाली.

नव्या वर्षाच्या प्रारंभी म्हणजे जानेवारीत मनमाड ते छत्रपती संभाजीनगर या ९८ कि.मी.च्या लोहमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ते जालन्यापर्यंतच्या विद्युतीकरणाच्या कामाला वेग देण्यात आला. यात आता बदनापूरपर्यंत म्हणजे आणखी ४३ कि.मी. रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले. छत्रपती संभाजीनगर ते बदनापूरपर्यंत शुक्रवारी इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे चालविण्याची चाचणीही घेण्यात आली.  आगामी महिनाभरात जालन्यापर्यंतचे काम पूर्ण होईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Electrification of railway line from Chhatrapati Sambhajinagar to Badnapur completed; Engine test also successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.