जिल्हा बँकेत आता शिवसेनेचे अकरा संचालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:04 AM2021-04-02T04:04:46+5:302021-04-02T04:04:46+5:30
ते म्हणाले, शेतकरी सहकार बँक विकास पॅनलमधून निवडून आलेले कृष्णा पाटील-डोणगावकर व त्यांच्या पत्नी देवयानी-डोणगावकर हे दोघेही शिवसेनेबरोबरच आहेत. ...
ते म्हणाले, शेतकरी सहकार बँक विकास पॅनलमधून निवडून आलेले कृष्णा पाटील-डोणगावकर व त्यांच्या पत्नी देवयानी-डोणगावकर हे दोघेही शिवसेनेबरोबरच आहेत.
प्रवेश केला नाही, करून घेतला : बागडे
नितीन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला नाही, तर त्यांचा प्रवेश करून घेण्यात आला. नितीन पाटील हे मनाने गेले नाहीत. त्यांच्यावर काही दिवसांपासून दबाव टाकला जात होता. त्या दबावाखाली ते शिवसेनेत गेले, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आ. हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, सुरेशदादा पाटील यांच्या निधनानंतर मी नितीन पाटील यांना मोठा धीर दिला. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी झालो. त्यामुळेच ते भाजपमध्ये फक्त माझ्याबरोबर राहिले. पदाधिकारी वगैरे काही नव्हते.
अपक्ष अभिषेक जैस्वाल हे मूळचे भाजपचेच आहेत. त्यांना धरून बँकेत भाजपचे चार संचालक असतील, असेही बागडे यांनी स्पष्ट केले.
आता काही अडचण नाही..
आता अध्यक्षपदाबाबत मला काही अडचण वाटत नाही. कृष्णा पाटील व देवयानी डोणगावकर हे दोघेही शिवसेनेबरोबरच आहेत. जावेद पटेल हे माझ्या सोबतच भाजपमध्ये आले होते. आताही ते माझ्यासोबतच राहतील, असा विश्वास नितीन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील यांचीच निवड केली जाईल, असे राज्यमंत्री सत्तार हे सांगत होते. मात्र, राज्यात भाजपकडून शिवसेनेची होत असलेली कोंडी पाहता जिल्हा बँकेच्या अध्यक्ष शिवसेनेचाच व्हावा, अशी भूमिका माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी घेतली होती. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचाच अध्यक्ष करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थानिक नेत्यांना दिले होते. या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यामुळे नितीन पाटील यांच्या अध्यक्षपदास सुरुंग लागण्याची चिन्हे होती. या पार्श्वभूमीवर नितीन पाटील हे शिवसेनेत आले.