अकरा हजार विद्यार्थी देणार आज ‘नेट’
By Admin | Published: December 28, 2014 01:16 AM2014-12-28T01:16:49+5:302014-12-28T01:28:19+5:30
औरंगाबाद : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने उद्या रविवारी ‘नेट’चे आयोजन करण्यात आले असून, या परीक्षेला मराठवाड्यातील ११ हजार ६५ विद्यार्थी बसले आहेत.
औरंगाबाद : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने उद्या रविवारी ‘नेट’चे आयोजन करण्यात आले असून, या परीक्षेला मराठवाड्यातील ११ हजार ६५ विद्यार्थी बसले आहेत. मागील परीक्षेच्या तुलनेत यावेळी ‘नेट’साठी विद्यार्थ्यांची संख्या ६ हजारांनी जास्त आहे. परीक्षेसाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) सहयोगाने पहिल्यांदाच ही परीक्षा घेतली जाणार असून, शहरातील देवगिरी महाविद्यालय, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, मौलाना आझाद महाविद्यालय, डॉ. रफिक झकेरिया महिला महाविद्यालय (नवखंडा), स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय या केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.
या परीक्षेसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे आठ निरीक्षक तैनात करण्यात आले असून, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचेही काही अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत.