निराधार योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी संचिका दाखल कराव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:06 AM2021-02-05T04:06:01+5:302021-02-05T04:06:01+5:30
सिल्लोड : निराधारांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरवणी मागण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केलेली आहे. ...
सिल्लोड : निराधारांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरवणी मागण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केलेली आहे. आचारसंहितेच्या कारणामुळे निराधार योजनेची बैठक होऊ शकली नाही. लवकरच ही बैठक होणार असल्याने जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात संचिका दाखल कराव्यात, असे आवाहन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
मतदार संघातील शेतकरी तसेच नागरिकांच्या समस्या जाणून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी (दि. ३०) तालुक्यातील भवन, अंधारी व भराडी सर्कलचा दौरा केला. यावेळी नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, डॉ. मच्छिंद्र पाखरे, उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, संचालक सतीश ताठे, विश्वास दाभाडे, हनिफ मुलतानी, डॉ. दत्ता भवर, परमेश्वर जीवरग, उत्तम शिंदे, भास्कर फुके, पांडुरंग जैवळ, सुभाष लोणकर, ज्ञानेश्वर जाधव, सुभाष जाधव, आदींची उपस्थिती होती.
फोटो : भराडी येथे आयोजित बैठकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार, सोबत सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे आदींची उपस्थिती होती.