आत्महत्या थांबविण्यासाठी भावनिक, आर्थिक साहाय्य महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:02 AM2021-06-17T04:02:01+5:302021-06-17T04:02:01+5:30

कोरोना, लॉकडाऊन काळात ज्या आत्महत्या झाल्या, त्यातील बहुसंख्य आत्महत्या या आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे झाल्या आहेत. या काळात वाढलेले कौटुंबिक ...

Emotional, financial support is important to stop suicide | आत्महत्या थांबविण्यासाठी भावनिक, आर्थिक साहाय्य महत्त्वाचे

आत्महत्या थांबविण्यासाठी भावनिक, आर्थिक साहाय्य महत्त्वाचे

googlenewsNext

कोरोना, लॉकडाऊन काळात ज्या आत्महत्या झाल्या, त्यातील बहुसंख्य आत्महत्या या आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे झाल्या आहेत. या काळात वाढलेले कौटुंबिक कलह, विविध कारणांमुळे आलेला एकटेपणाही आत्महत्येस कारणीभूत ठरला आहे. म्हणूनच आपल्या घरात, मित्रपरिवारात जर अशा नैराश्य आलेल्या व्यक्ती असतील, तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. मानसिक, भावनिक व आर्थिक स्तरावरही त्यांना जमेल तसा आधार द्या आणि सगळ्यात आधी बदललेल्या वाईट परिस्थितीला त्या व्यक्ती जबाबदार आहेत, असे त्यांना दूषण देणे थांबवा, असे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे.

चौकट :

जागतिक स्तरावर प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार मागील २० वर्षाच्या तुलनेत या दिड वर्षात आत्महत्या होण्याचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहे. हे मानसोपचार तज्ज्ञांसमोरचे मोठे आव्हान आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार दरदिवशी ३९ तरुण आणि २८ विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. हा मागील २५ वर्षांमधील सगळ्यात मोठा आकडा आहे. कोरोनामुळे प्रत्येकाची वाढलेली चिंता छातीत दुखणे, जीव घाबरणे, डोकेदुखी, निद्रानाश, नैराश्य, श्वास घ्यायला त्रास होणे, आपल्याच विचारात गुंग राहणे, असे अनेक आजार निर्माण करणारी ठरत आहे. ज्या व्यक्ती नैराश्याने त्रस्त आहेत त्यांनी लहान मुलांसोबत वेळ घालवावा, सकारात्मक गोष्टी पहाव्यात, ऐकाव्यात आणि हा काळ लवकरच निघून जाईल, असे म्हणत स्वत:ला हिंमत देण्याचा प्रयत्न करावा.

- डॉ. रश्मिन आचलिया

मानसोपचारतज्ज्ञ

चौकट

कुटुंबाने घ्यावी काळजी

१. आपल्या कुटुंबातील व्यक्ती सध्या कोणत्या त्रासातून जात आहे, हे कुटुंबाला चांगल्याप्रकारे माहीत असते. त्यामुळे त्या व्यक्तीची मानसिकता समजून घ्या. त्याच्याशी विविध विषयांवर संवाद साधून त्याला बोलते करा.

२. घरात पैसा नसेल तर निश्चितच अनेक अडचणी उद्भवतात. पण असेल तेवढ्यात भागवू असे म्हणून रोजगार गेलेल्या व्यक्तीला भावनिक आधार द्या.

३. सगळे जगच थोड्याफार फरकाने या अवस्थेतून जात आहे. त्यामुळे हा काळही बदलेल, असे वारंवार सांगून नैराश्यग्रस्त व्यक्तीला नवी उभारी देण्याचा प्रयत्न करा.

४. आर्थिक आणि मानसिकदृष्टीने खचलेल्या व्यक्तींना शक्यतो एकटे सोडू नका. मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेऊन त्यांचे समुपदेशन करून घ्या.

Web Title: Emotional, financial support is important to stop suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.