घर खरेदीनंतर इंटिरियरवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:04 AM2021-06-26T04:04:01+5:302021-06-26T04:04:01+5:30

औरंगाबाद : फ्लॅट, असो रोहाऊस, बंगला असो तो खरेदी केल्यानंतर लगेच कोणी राहायला जात नाही. घरातील अंतर्गत सजावट, फर्निचर ...

Emphasize the interior after buying a home | घर खरेदीनंतर इंटिरियरवर भर

घर खरेदीनंतर इंटिरियरवर भर

googlenewsNext

औरंगाबाद : फ्लॅट, असो रोहाऊस, बंगला असो तो खरेदी केल्यानंतर लगेच कोणी राहायला जात नाही. घरातील अंतर्गत सजावट, फर्निचर तयार करून मगच गृहप्रवेश केला जातो. पूर्वी नवीन घर खरेदी केल्यावर पहिले तिथे राहिला जात असत व नंतर सोयीनुसार इंटिरियर केले जात असे. पण आता ‘जमाना बदल गया है भाई’. घर खरेदी करतानाच लोक इंटिरियरसाठी स्वतंत्र बजेट बाजूला काढून ठेवतात. बांधकाम व्यावसायिकांकडून घराचा ताबा घेतल्यावर इंटिरियर डिझाईनर किंवा आर्किटेक्टला बोलविले जाते. त्यांना संपूर्ण फ्लॅट दाखवून त्यांच्याशी चर्चा केली जाते. त्यानंतर आर्किटेक्ट किंवा डिझाईनर घरातील सर्वांची पसंती लक्षात घेतात. त्यांच्या गरजा लक्षात घेतात त्यानंतर फ्लॅटचे माप मोजतो. झालेल्या चर्चेनुसार आराखडा म्हणजेच प्लॅन तयार केला जातो. घरातील फर्निचर अशा पद्धतीने ठेवावे की, रूममधला वावर हा अगदी सोपा व अडथळे विना असावा. चालण्यासाठी योग्य मापाचा पॅसेज (रस्ता) असावा. घरात असलेले सर्व लव्हिंगमध्ये.............. बसू शकतील किमान एवढ सीटिंग आणि डायनिंग असावं. जर जागा अपुरी असेल तर स्मार्ट पद्धतीने स्पेस सेव्हिंग फर्निचरचा उपयोग करावा. आजकालच्या फ्लॅटमध्ये किचनला सर्वात कमी जागा दिली जाते. तेवढ्या जागेत, संपूर्ण किचनचे साहित्य बसविणे म्हणजे कल्पकतेचा कस लागतो. फर्निचरचा आकार आणि रंग ठरवताना भिंती आणि पडदे यांचेही रंगाचा विचार करावा. २ पेक्षा जास्त रंग टाळावेत, एकामेकास कॅम्पलिमेंट करणारे रंग वापरावे. फॉल्स सिलिंगने इंटिरियरचा लूक आकर्षक होतो. तसेच लायटिंगकडे दुर्लक्ष होता कामा नये. कारण, व्यवस्थित वापरलेला लाईट्‌सचा घरातील इंटेरिअर्सचे लूक १०० टक्के सुधारतो. यासह अन्य लहान-मोठ्या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. कारण, घरात राहण्यासाठी गेल्यानंतर इएमआय व अन्य खर्चामुळे पुन्हा इंटिरियरसाठी वेगळे बजेट काढताना दमछाक होते व इंटिरियरचा निर्णय नंतर लांबणीवर पडतो. असा अनेकांचा अनुभव आहे. बजेट असेल तर गृहप्रवेशाआधीच इंटिरियर झाले पाहिजे.

Web Title: Emphasize the interior after buying a home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.