बचत गटाचे कर्मचारी बहुजन कामगार शक्ती महासंघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:05 AM2021-07-31T04:05:16+5:302021-07-31T04:05:16+5:30
मागील अनेक वर्षांपासून होणारी पिळवणूक थांबवावी, दर महिन्याला पगार दिला जावा, भविष्य निर्वाह निधीत पैसे जमा व्हावेत, बचत गटाचा ...
मागील अनेक वर्षांपासून होणारी पिळवणूक थांबवावी, दर महिन्याला पगार दिला जावा, भविष्य निर्वाह निधीत पैसे जमा व्हावेत, बचत गटाचा ठेका रद्द करावा, आदी मागण्या कर्मचाऱ्यांनी मांडल्या. याबाबत लवकरच प्रशासक यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येईल, २७ जुलै २०२१ च्या शासन निर्णयानुसार नवी मुंबई मनपात ज्या पद्धतीने कंत्राटी कामगारांना सेवेत समावून घेतले त्याच पद्धतीने या कामगारांनाही सेवेत कायम करावे म्हणून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन संघटनेतर्फे देण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय रगडे, अध्यक्ष अशोक हिवराळे, कैलाश जाधव, संतोष खरात, सतीश म्हस्के, रमेश गायकवाड, गणेश खरात, राजू येंद्रा, सुंदर दाभाडे, शंकर चव्हाण, प्रेम काळे, गुणाजी बकले, सिद्धार्थ साळवे, दीपक इंगळे, बाबासाहेब शेळके, अनिता छडीदार, नंदा मगरे, निता काळे, शिला सोनवणे, संगीता कांबळे, आदींची उपस्थिती होती.