घाटीत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 11:01 PM2019-05-17T23:01:29+5:302019-05-17T23:01:44+5:30
घाटीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन मे महिन्याचे १६ दिवस उलटून गेले तरी झालेले नाही.
औरंगाबाद : घाटीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन मे महिन्याचे १६ दिवस उलटून गेले तरी झालेले नाही. त्यामुळे याविषयी शुक्रवारी सकाळी कर्मचाºयांनी संताप व्यक्त केला.
घाटीत स्वच्छतेच्या कामकाजासाठी कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले आहेत. त्यांच्याकडून घाटीत स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली जाते. मात्र, कर्मचाºयांना वेळेवर वेतन मिळत नसल्याची स्थिती आहे. किमान १० तारखेपर्यंत वेतन होणे अपेक्षित आहे. परंतु वेतन झालेले नसल्याने कर्मचाºयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात घाटीतील कंत्राटी संस्थेचे सागर ताथोड म्हणाले, घाटी प्रशासनाकडे बिल सादर करण्यात आले. हे बिल मिळालेले नाही. त्यामुळे वेतनाला उशीर झाला आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने म्हणाले, वेतनासंदर्भात काही माहिती प्राप्त झालेली नाही. मात्र, कंत्राटदाराला बिल वेळेवर दिले जाते. कधी कधी बिल उशिरा जमा होते.