कर्मचाऱ्यांचे वेतन दोन दिवसांत होणार
By Admin | Published: March 18, 2016 01:01 AM2016-03-18T01:01:25+5:302016-03-18T01:51:59+5:30
जालना : पालिकेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. याविषयी जिल्हाधिकारी ए.एस.आर नायक यांनी
जालना : पालिकेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. याविषयी जिल्हाधिकारी ए.एस.आर नायक यांनी दखल घेत रखडलेले वेतन दोन दिवसांत होणार असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.
पालिकेत ९४३ कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वित्त विभागाकडून दोन कोटींचे सहाय्यक अनुदान मिळते. लोकमतमध्ये गुरूवारी वेतन रखडल्याचे वृत्त प्रकाशित करण्यात आले. विशेष म्हणजे जानेवारी म्हणजे महिन्याचे सहाय्यक अनुदान प्राप्त झाल्याचे परिपत्रकही कर्मचारी संघटनेचे महासचिव कैलास वाघमारे यांनी लोकमत कार्यालयात आणून दिले. यावरून जिल्हाधिकारी नायक यांना विचारले असता, नगर पालिका कर्मचाऱ्यांचे डिसेंबर महिन्याचे वेतन फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात आले. जानेवारी महिन्याचे वेतन मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळाले. वेतन दोन दिवसांत तात्काळ देण्यात येईल. फेबु्रवारी महिन्याचे अनुदान अद्याप प्राप्त झालेले नाही. वेतन तात्काळ अदा केले जाईल.