इमूने उडवली झोप !

By Admin | Published: August 8, 2015 11:53 PM2015-08-08T23:53:40+5:302015-08-09T00:31:40+5:30

बीड : नाशिक येथील इंडियन इमू लाईफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पैसे दामदुप्पट करण्याचे अमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे

Emu was sleeping! | इमूने उडवली झोप !

इमूने उडवली झोप !

googlenewsNext


बीड : नाशिक येथील इंडियन इमू लाईफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पैसे दामदुप्पट करण्याचे अमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील ११ जणांनी या कंपनीत ३२ लाख ८३ हजार रूपये गुंतवले आहेत. या फसवणुकीचा तपास गुन्हे अन्वेषण विभागामार्फत होत आहे.
नाशिक येथील इंडियन इमू लाईफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने २०१० ते ११ च्या कालावधीत गुंतवणूक करणाऱ्यांना दामदुपटीचे अमिष दाखवले होते. या कंपनीची पाळेमुळे पूर्ण महाराष्ट्रात पसरले होते. जिल्ह्यात या कंपनीचा प्रचार व प्रसार झपाट्याने झाला होता. कंपनीच्या सुरूवातीला अनेकांनी गुंतविलेले पैसे दामुदपटीने मिळत असल्याने इतरांनीही त्यांच्यासोबत या कंपनीत गुंतवणूक केली. बीड येथील हरीश कुकडेजा यांनी ५ लाख ८५ हजार, अन्विता गायकवाड यांनी १ लाख ७० हजार, अमोल नवले यांनी एचडीएफसीच्या चेकद्वारे ३ लाख, महेश कदम यांनी एचडीएफसीच्या चेकद्वारे ६ लाख, लक्ष्मण वाघमारे यांनी १ लाख ९९ हजार, अशोक जाधव यांनी ४५ हजार, माणिक विठोबा आमटे यांनी १ लाख ४९ हजार ९७० रूपये, भागवत विठोबा आमटे यांनी १ लाख ४९ हजार ९९५ रूपये, गणेश भगवान काशिद यांनी २ लाख ५० हजार, सुरेश नारायण कारके यांनी ७ लाख, नवनाथ राधाकिसन आवघड यांनी १ लाख ७४ हजार ९७० रूपये गुंतविले होते. हा घोटाळा राज्यभर उघडकीस आल्यानंतर विविध जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आले. बीड येथील हरीश कुकडेजा यांनी फिर्याद दाखल केली होती. हा तपास व्यापक असल्यामुळे राज्यस्तरावरून गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला आहे.
जिल्हास्तरावरील गुन्हे अन्वेषण विभागामार्फत तक्रारदारांनी गुंतवलेली रक्कम, त्याचा प्रकार आदीची माहिती स्वीकारली जात आहे. हा अहवाल वरिष्ठ कार्यालयास चौकशीअंती सादर केला जाणार आहे. गेल्या महिनाभराच्या कालावधीत पाच तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्यापूर्वी सहा तक्रारी दाखल झालेल्या आहेत. संपूर्ण तक्रारी आल्यानंतर हा घोटाळा नेमका कसा झाला ? पैसे कुठे गेले ? ज्या खात्यात पैसे जमा झाले आहेत तेथून कुणाच्या खात्यावर पाठविण्यात आले ? आदींची माहिती समोर येणार आहे. तत्पूर्वी संपूर्ण माहिती व्यापक स्वरूपात गोळा करण्याचे काम गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सुरू आहे. त्यामुळे ज्या गुंतवणूकदाराची फसवणूक झाली आहे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पैसे मिळण्याबद्दल अनिश्चितता
नाशिक येथील इंडियन इमू लाईफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत अनेकांनी लाखो रूपयांचा भरणा केला. या घोटाळ्याची चौकशी सविस्तरपणे सुरू आहे. तपासाअंती सीआयडी आपला अहवाल सादर करील, त्यानंतर हे प्रकरण न्यायालयासमोर जाईल. त्यानंतर गुंतवण्यात आलेल्या रकमेचा आकडा समोर येईल. मात्र, पैसे मिळतील की नाही याची शक्यता कमीच आहे. (प्रतिनिधी)
नाशिक येथील इंडियन इमू लाईफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने गुंतवणूकदारांना अमिष दाखवून त्यांची फसवणूक केली. ही फसवणूक कोट्यवधीची असल्याचा अंदाज बांधला जातो.
४हे फसवणुकीचे प्रकरण समोर असतानाही अनेकजण पैशाच्या हव्यासापोटी विविध कंपन्यांमध्ये आपल्या मेहनतीचे पैसे गुंतवत राहतात.
४शेवटी कंपनी पैसे घेऊन फरार होते. तक्रारदारांना पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याशिवाय पर्याय राहत नाही. फिर्याद दाखल केल्यानंतर तपास झाला तरीही पैसे परत मिळतील याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे अशा कंपन्यांपासून चार हात दूर राहिलेले कधीही चांगलेच म्हणावे लागेल.

Web Title: Emu was sleeping!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.