दिवाळीनंतर पाडापाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 12:43 AM2017-10-03T00:43:51+5:302017-10-03T00:43:51+5:30

शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि नाल्यांमधील झालेल्या अतिक्रमणांसंदर्भात ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात ‘पावसाळा संपला तरी अतिक्रमणे जशास तशी’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत मनपा प्रशासन दिवाळीनंतर शहरात पाडापाडी मोहीम हाती घेणार आहे.

Enchrochments removal; After Diwali, | दिवाळीनंतर पाडापाडी

दिवाळीनंतर पाडापाडी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि नाल्यांमधील झालेल्या अतिक्रमणांसंदर्भात ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात ‘पावसाळा संपला तरी अतिक्रमणे जशास तशी’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत मनपा प्रशासन दिवाळीनंतर शहरात पाडापाडी मोहीम हाती घेणार आहे.
मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी अतिक्रमण हटाव पथकाला पाडापाडीसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहे.
मागील महिन्यात शहरात झालेल्या अतिवृष्टीने दाणादाण उडाली होती. नाल्याचे पाणी अनेक घरांमध्ये शिरले होते. जयभवानीनगरातून वाहणाºया नाल्यावरच १३५ जणांनी बांधकामे केली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. भारतनगर, गजानननगर, मयूरनगर, सूतगिरणी चौक, नूर कॉलनी, मयूर पार्क, पुंडलिकनगर, हनुमाननगर, गुरुगोविंदसिंगपुरा, सिडको एन-४, सह अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले होते. शहराच्या ६८ वसाहतींमध्ये पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या होत्या. जयभवानीनगरातील नाल्यावरील बांधकामे तातडीने हटविण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत. मागील सर्वसाधारण सभेत प्रशासनातर्फे अतिक्रमणे तीन दिवसांमध्ये काढण्याचे आश्वासनही नगरसेवकांना दिले होते. ‘लोकमत’ने शहराच्या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांसह नाल्यांचा प्रश्नही उपस्थित केला होता. यानंतर मनपा प्रशासनाने सोमवारी नवरात्रोत्सव आणि १०० कोटी रस्त्यांच्या निविदा काढण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू असून, दिवाळीनंतर पाडापाडीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले.
बीड बायपास रोड २०० मीटर रुंद करण्यासाठी मनपाने कारवाई सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात बाधित मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात मार्किंग करण्यात आली. तसेच मालमत्ताधारकांची सुनावणीही घेण्यात आली. या रस्त्यावरील १३७ मालमत्ताधारकांचे नियमानुसार भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादन करताना मोबदला द्यावा लागणार असल्याने मनपाची अडचण झाली आहे.
महापालिका मालमत्ताधारकांसमोर टीडीआर आणि एफएसआय घ्या असे दोनच पर्याय ठेवणार आहे. रोख रक्कम अथवा बाजार दरानुसार मोबदला देण्याचा तिसरा पर्याय मनपाकडे उपलब्ध नाही.

Web Title: Enchrochments removal; After Diwali,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.