वाळूज परिसरातील रांजणगाव तलाव क्षेत्रात अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 06:37 PM2018-12-28T18:37:47+5:302018-12-28T18:40:08+5:30

रांजणगाव शेणपुंजी परिसरात असलेल्या पाझर तलावातील संपादित क्षेत्रात अतिक्रमण करुन बांधकाम करण्यात येत आहे. या अनधिकृत बांधकाम प्रकरणी शुक्रवारी ग्रामपंचायतीने तहसीलदार व पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 Encroachment in the area of Ranjangaon area of Waluj area | वाळूज परिसरातील रांजणगाव तलाव क्षेत्रात अतिक्रमण

वाळूज परिसरातील रांजणगाव तलाव क्षेत्रात अतिक्रमण

googlenewsNext

वाळूज महानगर : लघु पाटबंधारे विभागाच्या रांजणगाव शेणपुंजी परिसरात असलेल्या पाझर तलावातील संपादित क्षेत्रात अतिक्रमण करुन बांधकाम करण्यात येत आहे. या अनधिकृत बांधकाम प्रकरणी शुक्रवारी ग्रामपंचायतीने तहसीलदार व पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याविषयी ग्रामपंचायतीचा कुठलाही अधिकार नसतानाही कारवाई केली जात असल्याचा दावा अतिक्रमणधारकाने केला आहे.


रांजणगाव शेणपुंजी परिसरात पाझर तलावासाठी शासनाने चार दशकांपूर्वी या भागातील जमीन संपादित केली होती. पूर्वी या तलावात पावसाचे पाणी साचत असल्याने तसेच वरच्या भागातून येणाऱ्या नदी-नाल्याचे पाणीही तलावात मिसळत असल्यामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरत होता. या तलावातील पाण्यामुळे विविध पिके घेत होती.

तसेच परिसरातील विहिरीच्या पाणी पातळीतही वाढ होत असल्याने हा तलाव शेतकºयांसाठी वरदान ठरला होता. मात्र, दशकभरापासून काही कारखान्यांचे सांडपाणी सोडले जात असल्याने तलावातील पाणी दूषित झाले आहे. हेच दूषित पाणी प्राशन केल्याने काही जनावरे दगावली आहेत. काही वर्षांपूर्वी या तलावात तीन मुलांचा बुडून मृत्युही झाला होता. हा तलाव बुजविण्याची मागणी ग्रामपंचायतीने लघु पाटबंधारे विभाग व तहसीलदारांकडे केलेली आहे. मात्र, याकडे संबधित विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांनी केला आहे.


या तलाव क्षेत्रात ग्रामपंचायतीने पाच वर्षांपूर्वी कचरा डेपो उभारला असून, कचरा डेपोसाठी जागा द्यावी, यासाठी एमआयडीसीकडे प्रस्तावही दिलेला आहे. दरम्यान, महिनाभरापूर्वी या कचरा डेपोलगत विक्रम बाबूराव बोºहाडे यांनी बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सरपंच संजीवनी सदावर्ते, उपसरपंच मोहनीराज धनवटे, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, ग्रामविकास अधिकारी एस.एन.रोहकले, सदस्य सुभाष सोनवणे, भिमराव किर्तीकर, अशोक शेजुळ, भिमराव खंदारे यांनी शुक्रवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे व तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांच्याकडे तक्रार केली आहे. भविष्यात या जागेचा वापर कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी केला जाणार असल्याने सदरील अतिक्रमण हटविण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांनी केला आहे.

या तलावासाठी आमची १ हेक्टर जमीन संपादीत झालेली आहे. यापूर्वी पाटबंधारे विभागाच्या परवानगीने या जमिनीचा वापर गाळपेरासाठी केलेला आहे. या वर्षी मुदत वाढविण्यासाठी २१ नोव्हेंबरला अर्जही दिला आहे. या तलावाचा वापर बंद असल्याने या संपादित क्षेत्रावर आपला हक्क असल्याचा दावा विक्रम बोºहाडे यांनी केला आहे.

Web Title:  Encroachment in the area of Ranjangaon area of Waluj area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Walujवाळूज