एमआयडीसीच्या भाजीमंडईवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 09:33 PM2018-12-31T21:33:04+5:302018-12-31T21:33:17+5:30
एमआयडीसी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेकांनी भाजीमंडईवर अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणामुळे भाजीमंडईच गायब झाल्याने विक्रेत्यांवर रस्त्यावर बसून व्यवसाय करण्याची वेळ आली आहे.
वाळूज महानगर: एमआयडीसी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेकांनी भाजीमंडईवर अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणामुळे भाजीमंडईच गायब झाल्याने विक्रेत्यांवर रस्त्यावर बसून व्यवसाय करण्याची वेळ आली आहे.
बजाजनगर कामगार नागरी वसाहत अस्तित्वात आल्यावर एमआयडीसी प्रशासनाने भाजीमंडई उभारली. कामगार कल्याण भवन ते मोरे चौक जोडणाऱ्या रस्त्यावर उभारलेल्या भाजीमंईत एमआयडीसीने ओठे बांधून विक्रेत्यांना वाटप केले. दरम्यान, प्रशासनाने भाजीमंडईच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे भाजीमंडई धूळ खात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भाजीमंडईच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. अनेकजण तेथे झोपड्या बांधून वास्तव्य करीत आहेत. तर काहींनी शेड उभारुन व्यवसाय सुरु केला आहे.
एमआयडीसीच्या अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. अतिक्रमण हटवून विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी भाजीपाला विक्रेत्यांमधून होत आहे. या विषयी एमआयडीसीचे अभियंता विनायक मुळे यांच्यशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
भाजीपाला विक्रेते रस्त्यावर
एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने भाजीपाला विक्रेते रस्त्यावर आले आहेत. हक्काची जागा गेल्याने व पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने विक्रेत्यांना रस्त्यावर बसून व्यवसाय करावा लागत आहे. विक्रेते रस्त्यावर आल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत असून, वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.