२१ दिवसीय ऑनलाईन योग शिबिराचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:04 AM2021-06-22T04:04:47+5:302021-06-22T04:04:47+5:30
औरंगाबाद : इंटरनॅशनल रिफ्लेक्सोलॉजी जैन असोसिएशन यांच्यावतीने आयोजित २१ दिवसीय ऑनलाईन मोफत योग शिबिराचा सोमवारी लोकमत भवन येथे समारोप ...
औरंगाबाद : इंटरनॅशनल रिफ्लेक्सोलॉजी जैन असोसिएशन यांच्यावतीने आयोजित २१ दिवसीय ऑनलाईन मोफत योग शिबिराचा सोमवारी लोकमत भवन येथे समारोप झाला. जैन रिफ्लेक्सोलॉजी दिनापासून म्हणजेच १ जूनपासून आयोजित या शिबिरास औरंगाबाद डिस्ट्रिक्ट ऑटोमोबाईल ॲण्ड टायर डिलर्स असोसिएशन व महावीर इंटरनॅशनल मेट्रोसिटी यांचे सहकार्य लाभले. शिबिर समारोपप्रसंगी लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते आयोजक फिटनेस वेच्या संचालिका मंजू ठोले, यतिन ठोले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, तर अनिल जैन यांना पुस्तक भेट देण्यात आले. संघटनेच्यावतीने सहसंयोजक राजकुमार जैन बांठिया, औरंगाबाद डिस्ट्रिक्ट ऑटोमोबाईल अँड टायर डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कावळे, महावीर इंटरनॅशनल मेट्रोसिटीचे अध्यक्ष नरेश बोथरा यांचा सन्मान करण्यात आला. ती तीनही संघटनांच्या वतीने राजेंद्र दर्डा यांचा सत्कार करण्यात आला. या शिबिर समारोप कार्यक्रमाचे यू ट्यूब, फेसबुक यावरून थेट प्रसारण करण्यात आले. दररोज सकाळी ७ ते ७.४० दरम्यान शिबिर झाले, यात मंजू ठोले यांनी मार्गदर्शन केले. तर ७.४० ते ८ दरम्यान विविध विषयांतील तज्ज्ञांचे चर्चासत्र पार पडले.
कॅप्शन
लोकमत भवन येथे सोमवारी झालेल्या योग शिबिराच्या समारोपप्रसंगी आयोजकांचा सत्कार करताना ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा. समवेत डावीकडून संतोष कावळे, मंजू ठोले, यतिन ठोले, अनिल जैन, राजकुमार बांठिया नरेश बोथरा.