नोकरीच्या अमिषाने अभियंत्यानेच गंडविले २०० बेरोजगारांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 07:16 PM2018-10-27T19:16:45+5:302018-10-27T19:17:12+5:30
२०० सुशिक्षित बेरोजगारांना गंडविणाऱ्या अभियंत्याला ग्रामीण पोलिसांच्या सायबर क्राईम सेलने अटक केली.
औरंगाबाद: स्कोडा, सिमेन्स, मायलन, एनआरबी अशा विविध नामांकित कंपन्यांत नोकरी देण्याचे अमिष दाखवून आणि बोगस नियुक्त्ीपत्रे पाठवून २०० सुशिक्षित बेरोजगारांना गंडविणाऱ्या अभियंत्याला ग्रामीण पोलिसांच्या सायबर क्राईम सेलने अटक केली. आरोपीला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
निलेश अशोक वडमारे (वय २९,रा. बीड)असे आरोपीचे नाव आहे. तो आस्था कन्सटंन्सी नावाची फर्म चालवित होता. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आरोपी हा अभियंता असून तो काही वर्ष पुण्यात नोकरीला होता. दिवसेंदिवस बरोजगार तरूणांची संख्या वाढतच असल्याने विविध नोकरी संदर्भ वेबसाईटवर रोज हजारो बेरोजगार नोंदणी करतात. याचाच गैरफायदा आरोपीने घेतला. जस्ट डायल डॉट कॉम आणि क्विकर या वेबसाईटवर बेरोजगारांनी टाकलेल्या प्रोफाईल त्यांच्यांशी संपर्क साधत. त्याच्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभवानुसार तो उमेदवारांना विविध नामांकित कंपनीत नोकरीची संधी असून तेथील रिक्त पदे भरण्यासाठी कंपनीने त्यांच्या कन्सलटंन्सीला काम दिले असल्याची बतावणी करीत. तुम्हाला नोकरी हवी असेल तर नोंदणी शुल्क, मुलाखत फिसच्या नावाखाली तो पाच हजार ते साडेसात हजार रुपये घेत.
याशिवाय नोकरी लागल्यानंतर पहिल्या वेतनाच्या ५०टक्के रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा करण्याचे सांगत. त्याच्यावर विश्वास ठेवून सुमारे उमेदवार त्याने दिलेल्या बँक खाते क्रमांकावरच्या आधारे पाच हजार ते साडेसात हजार रुपये जमा करीत. पैसे जमा झाल्यानंतर आरोपी त्यांच्या ई-मेलवर अथवा पोस्टाने त्याच्या पत्त्यावर संबंधित कंपनीचे बनावट नियुक्तीपत्रे पाठवून देत. अशाप्रकारे आरोपीने तब्बल २०० बेरोजगारांकडून साडेसात लाख रुपये उकळले. बोगस नियुक्तीपत्रे पाठविताना तो संबंधित कंपन्यांचे लोगो वापरत, यामुळे ते नकली आहे, याबाबतची शंका उमेदवारांना येत नव्हती. मात्र उमेदवार जेव्हा संबंधित कंपनीत नियुक्तीपत्र घेऊन जात तेव्हा त्याच्या पदरी निराशा पडत.
बऱ्याचदा संबंधित कंपनीत रिक्त पदे असेल आणि कंपनीला मनुष्यबळाची आवश्यकता असेल तेव्हा उमेदवारांच्या नशिबाने जर कंपनीने त्यांना नोकरी दिली तर आपल्या कन्सलटंन्सीमुळेच तुझी निवड झाली, असे तो सांगून उमेदवाराच्या पहिल्या वेतनातील अर्धी रक्कम घेत. आपल्या कंपनीचा लोगो परस्पर वापरून फसवणुक केली जात असल्याचे स्कोडा कंपनीला समजताच त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ.सिंह यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक अशोक गिरी, उपनिरीक्षक मोहसीन सय्यद