होमगार्ड भरतीसाठी इंजिनिअर, एम.एस्सी., बी.एड. उमदेवारांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 11:45 PM2019-02-07T23:45:29+5:302019-02-07T23:46:25+5:30

येथील गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) रिक्त ५४५ पदभरतीसाठी बी.ए., बी.कॉम., एलएल.बी., एम.एस्सी., एम.ए., बी.एड, इंजिनिअर, अशा उच्चशिक्षित उमेदवारांनी अर्ज केले आहेत. बेरोजगारीमुळे हे उच्चशिक्षित तरुण-तरुणी आलेली प्रत्येक संधी अजमावून पाहत आहेत. नोंदणीकृत २ हजार ५७३ उमेदवारांची गुरुवारी पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी क्रीडा मैदानावर शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली. या चाचणीत पात्र ठरलेल्या २ हजार ४४५ उमेदवारांच्या शारीरिक चाचणी गुणांचा निकाल १५ फेब्रुवारी रोजी जाहीर केला जाणार आहे.

Engineer for Home Guard recruitment, M.Sc., B.Ed. Umdewar's application | होमगार्ड भरतीसाठी इंजिनिअर, एम.एस्सी., बी.एड. उमदेवारांचे अर्ज

होमगार्ड भरतीसाठी इंजिनिअर, एम.एस्सी., बी.एड. उमदेवारांचे अर्ज

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा होमगार्ड भरती प्रक्रिया : ५४५ पदांकरिता २,५७३ उमेदवारांचे अर्ज


औरंगाबाद : येथील गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) रिक्त ५४५ पदभरतीसाठी बी.ए., बी.कॉम., एलएल.बी., एम.एस्सी., एम.ए., बी.एड, इंजिनिअर, अशा उच्चशिक्षित उमेदवारांनी अर्ज केले आहेत. बेरोजगारीमुळे हे उच्चशिक्षित तरुण-तरुणी आलेली प्रत्येक संधी अजमावून पाहत आहेत. नोंदणीकृत २ हजार ५७३ उमेदवारांची गुरुवारी पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी क्रीडा मैदानावर शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली. या चाचणीत पात्र ठरलेल्या २ हजार ४४५ उमेदवारांच्या शारीरिक चाचणी गुणांचा निकाल १५ फेब्रुवारी रोजी जाहीर केला जाणार आहे.
जिल्हा होमगार्डच्या समादेशक डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी सांगितले की, जिल्हा होमगार्डसाठी १ हजार ६५० होमगार्ड जवानांची मंजुरी आहे. यापैकी सध्या १ हजार १०५ जवान कार्यरत आहेत. रिक्त ५४५ पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी क्रीडा मैदानावर गुरुवारी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या भरतीसाठी २ हजार ५७३ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यातील बहुतेक उच्चशिक्षित असल्याचे डॉ. धाटे-घाडगे यांनी सांगितले. या सर्व उमेदवारांची शारीरिक तपासणी करण्यात आली. या तपासणीत २ हजार ४४५ उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले. पात्र पुरुष उमेदवारांसाठी गोळाफेक आणि १ हजार ६०० मीटर धावणे ही स्पर्धा घेण्यात आली, तर महिला उमेदवारांकरिता ८०० मीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील उमेदवारांचा निकाल १५ फेब्रुवारी रोजी पोलीस आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध क रण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया डॉ. धाटे-घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सहायक पोलीस आयुक्त, पाच पोलीस निरीक्षक़, ३० सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि ३०० कर्मचारी राबवीत आहेत.
चौकट
अशी आहेत रिक्त पदे...
औरंगाबाद शहर पुरुष १६, महिला १२५, औरंगाबाद ग्रामीणमधील वैजापूर पुरुष ३९, महिला २३, गंगापूर पुरुष ६१, महिला २७, सिल्लोड पुरुष ३०, महिला ९, खुलताबाद पुरुष ३८, महिला १९, सोयगाव पुरुष ३३, महिला २४, कन्नड पुरुष २६, महिला २०, पैठण पुरुष ३६, महिला १९.

Web Title: Engineer for Home Guard recruitment, M.Sc., B.Ed. Umdewar's application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.