अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्चला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:04 AM2021-03-19T04:04:32+5:302021-03-19T04:04:32+5:30

२५ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन औरंगाबाद : अनुसूचित जातीच्या स्वयंसाहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा ...

Engineering Service Pre-Examination on 27th March | अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्चला

अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्चला

googlenewsNext

२५ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

औरंगाबाद : अनुसूचित जातीच्या स्वयंसाहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याच्या योजनेसाठी या आर्थिक वर्षामध्ये नवीन स्वयंसाहाय्यता बचत गटांनी समाजकल्याण विभागाकडे २५ मार्च २०२१ पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत, असे सहायक आयुक्तांनी कळविले आहे.

राज्य सेवा पूर्व परीक्षा २१ मार्च रोजी

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा रविवारी (दि. २१) जिल्ह्यात ५९ शाळा, महाविद्यालयांत होणार आहे. या परीक्षेसाठी १९६५६ उमेदवारांना प्रवेशपत्रे देण्यात आली आहेत. सकाळच्या सत्रात १० ते १२ व दुपार सत्रात दुपारी ३ ते ५ या वेळेत परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी २१६७ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, रेस्टॉरंट पूर्णत: बंद असल्यामुळे उमेदवारांनी भोजनाचे पदार्थ सोबत आणावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी केले.

बीड बायपासवरील दोन मालमत्ता पाडल्या

औरंगाबाद : महापालिकेने बीड बायपास रस्ता रुंदीकरणासाठी सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. मोहिमेत गुरुवारी दोन मालमत्ता पाडल्या. आजवर १८ मालमत्ता हटविण्यात आल्या. महानुभाव आश्रम चौक येथून मालमत्ता पाडण्यास सुरुवात करण्यात आली. वाजेद खान शबीर यांची इमारत पाडण्यात आली. पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, आर. एस. राचतवार, वसंत भोये, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, मजहर अली यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ड्रेनेजची कामे तातडीने पूर्ण करा

औरंगाबाद : विभागीय आयुक्त कार्यालय आणि जलश्री या निवासस्थानाच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला सुरू असलेले ड्रेनेजचे काम तातडीने पूर्ण करा, असे आदेश महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दिले. आयुक्तालयाचा मुख्य रस्ता या कामामुळे अडला असून वाहने व येणाऱ्या-जाणाऱ्यांची अडचण होत आहे. यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे यांची उपस्थिती होती.

सहा प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबाद : विमानतळ व रेल्वेस्टेशन येथील १९२ प्रवाशांची गुरुवारी कोरोना चाचणी करण्यात आली. बुधवारी केलेल्या चाचण्यांत ६ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल गुरुवारी सकाळी प्राप्त झाला. दिवसभरात रेल्वे स्टेशनवर १६० प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. विमानतळावर ३२ प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब घेतले. आजच्या सर्व चाचण्यांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त होतील.

५७ व्यापाऱ्यांना झाली कोरोनाची लागण

औरंगाबाद : महापालिका, जिल्हा व्यापारी महासंघाच्या सहकार्याने शहरात व्यापाऱ्यांची सहा केंद्रांवर कोरोना चाचणी केली जात आहे. गुरुवारी दिवसभरात केलेल्या ६०५ चाचण्यांतून ५७ जण पॉझिटिव्ह निघाले. चार दिवसांत एकूण २५२ व्यापारी पॉझिटिव्ह आढळले. तापडिया नाट्य मंदिर येथील २०० चाचण्यांतून १२ व्यापारी, जाधववाडी मंडीत ५६ पैकी ४, गेंदा भवनात ५० पैकी १४, रामनगरात १२५ पैकी ९, जुना मोंढा येथे १०० पैकी ९, तर कासारी बाजारातील बालाजी मंदिरात ७४ चाचण्यांतून ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

Web Title: Engineering Service Pre-Examination on 27th March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.