अपार्टमेंटवरुन उडी घेऊन अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:02 AM2021-03-28T04:02:07+5:302021-03-28T04:02:07+5:30
मनीषा भगवान शेळके (१९) असे मृत तरुणीचे नाव आहे. मनीषा ही आईसोबत सातारा परिसरात फ्लॅट किऱायाने घेऊन चार ते ...
मनीषा भगवान शेळके (१९) असे मृत तरुणीचे नाव आहे. मनीषा ही आईसोबत सातारा परिसरात फ्लॅट किऱायाने घेऊन चार ते पाच महिन्यांपासून राहात होती. तिच्या आई-वडिलांचे आपसांत पटत नसल्यामुळे १७ वर्षांपासून ते विभक्त राहतात. याबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्याची शुक्रवारी तारीख होती. मनीषा आईसोबत शुक्रवारी तारखेस हजर राहण्यासाठी न्यायालयात गेली होती. सायंकाळी मायलेकी घरी परतल्या. यावेळी आई फ्लॅटमध्ये गेल्यावर मनीषाने दाराला बाहेरुन कडी लावून घेतली आणि ती थेट चौथ्या मजल्यावरील गच्चीवर गेली. यानंतर तिने तेथून खाली उडी घेतली. सुमारे ५५ फुटांवरुन खाली पडल्यामुळे मनीषाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडली. या घटनेनंतर मनीषाला प्रथम खासगी रुग्णालयात आणि तेथून घाटीत दाखल केले; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी मनीषाला तपासून रात्री ८ वाजता मृत घोषित केले. याप्रकरणी सातारा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस हवालदार शेषराव चव्हाण तपास करीत आहेत. मनीषाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. (फोटो)
=============
चौकट
मनीषा ही बालपणापासूनच तिची आई आणि मामाकडे सिडको एन २ येथे राहत होती. एमआयटी कॉलेजमध्ये तिने प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. कॉलेज ते घर जाण्या-येण्यास त्रास होईल म्हणून त्यांनी महाविद्यालय परिसरात फ्लॅट किरायाने घेऊन राहण्यास आल्या होत्या.