Video: दुकानात शिरून व्यापाऱ्याच्या हातात चाकू खुपसला; भरदिवसा १२ लाखांचे दागिने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 06:25 PM2023-08-08T18:25:09+5:302023-08-08T18:25:49+5:30

मारहाणीचा प्रतिकार करताच सराफा व्यापाऱ्याच्या हाताच्या पंजात चोरट्यांनी चाकू खुपसला

entered the shop and stabbed the shopkeeper in the hand; Jewels worth 12 lakhs were looted in broad daylight | Video: दुकानात शिरून व्यापाऱ्याच्या हातात चाकू खुपसला; भरदिवसा १२ लाखांचे दागिने लुटले

Video: दुकानात शिरून व्यापाऱ्याच्या हातात चाकू खुपसला; भरदिवसा १२ लाखांचे दागिने लुटले

googlenewsNext

- मेहमूद शेख

वाळूज महानगर : भरदिवसा व्यावसायिकास चाकूचा धाक दाखवून सराफा दुकान लुटल्याची थरारक घटना आज दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास रांजणगावात घडली. जवळपास १० ते १२ लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केलाच अंदाज आहे.

मुकुंद उत्तमराव बेदरे (५०, रा.सिडको वाळूजमहानगर) यांचे रांजणगाव शेणपुंजी येथे सराफा दुकान आहे. आज ११.३० वाजेच्या सुमारास अचानक दुकानात एका चोरट्याने प्रवेश करत काऊंटवरुन उडी मारत बेदरे यांना मारहाण सुरु केली. याचवेळी इतर दोघांनी दुकानात प्रवेश करत शटर लावून घेतले. एका लुटारुने बेदरे यांच्या हाताच्या पंजावर चाकू मारला. यामुळे जिवाच्या भितीने ते शांत बसले. यानंतर दोघा लुटारुंनी दुकानाच्या रॅकवर सजविलेले दागिने पटापट बँगामध्ये भरले. अवघ्या काही मिनिटांत १२ लाख रुपयांचे दागिने घेऊन तिन्ही चोरटे तेथून पसार झाले. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, दुय्यम निरीक्षक गणेश ताठे, उपनिरीक्षक अशोक इंगोले, सचिन पागोटे, संदीप शिंदे, पोकॉ. सुरेश कच्चे, सुरज अग्रवाल, राजाभाऊ कोल्हे, अविनाश ढगे तसेच गुन्हे शाखा व ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 

दुचाकीवरून झाले फरार
चोरटे पळून जाताना शेजारच्या औषधी दुकानातील एका मुलींने आरडा-ओरडा केला. त्यानंतर शेजारील दुकानदार व नागरिकांनी बेदरे यांच्या दुकानात धाव घेतली. काही नागरिकांनी पाठलाग केला असता दोन दुचाकीवरून चोरटे पसार झाले. विशेष म्हणजे, चोरी सुरु असताना एक साथीदार दुकानाबाहेर रेकी करीत असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. 

Web Title: entered the shop and stabbed the shopkeeper in the hand; Jewels worth 12 lakhs were looted in broad daylight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.