‘लोकमत रंगिलो दांडिया’ची सर्वत्र धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:12 AM2017-09-27T01:12:27+5:302017-09-27T01:12:27+5:30

दांडियाच्या रंगात रंगलेल्या तरुणाईचा चैतन्यपूर्ण जल्लोष प्रोझोनच्या सहकार्याने आयोजित ‘लोकमत रंगिलो दांडिया’दरम्यान दिसून आला.

Enthusiasm everywhere in 'Lokmat Rangilo Dandiya' | ‘लोकमत रंगिलो दांडिया’ची सर्वत्र धूम

‘लोकमत रंगिलो दांडिया’ची सर्वत्र धूम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कुटुंबियांसोबत धमाल करीत मनसोक्त दांडिया खेळण्याचा आनंद शहरातील तरुणाईने लुटला आणि प्रोझोनच्या हिरवळीवर जणू आनंदाला, उत्साहाला उधाण आले. दांडियाच्या रंगात रंगलेल्या तरुणाईचा चैतन्यपूर्ण जल्लोष प्रोझोनच्या सहकार्याने आयोजित ‘लोकमत रंगिलो दांडिया’दरम्यान दिसून आला.
विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते आरती झाली. याप्रसंगी ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष संदीप बिश्नोई, विजय वाडकर, खुशालचंद बाहेती, प्रीतम दरख, प्रोझोनचे मोहम्मद अर्शद, मनोज बोरा यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनीही प्रोझोन येथे भेट देऊन गरबाप्रेमींचा उत्साह वाढविला. पारंपरिक वातावरणात पारंपरिक गीतांवर नृत्य करीत खेळल्या जाणाºया दांडिया हे ‘लोकमत रंगिलो दांडिया’चे खास वैशिष्ट्य. ‘पंखिडा...’, ‘सावन मे...’, ‘माँ शेरोवाली...’ या गाण्यांवर सुरेख लय पकडत तरुणांनी केलेला रास दांडिया लक्षवेधक ठरला.
आजचा दिवस (दि. २७) सखीमंच सदस्या आणि प्रिव्हिलेज मंचच्या सदस्यांसाठी विशेष महत्त्वाचा आहे. कारण केवळ आजच या सदस्यांना दांडिया खेळण्यासाठी किंवा बघण्यासाठी मोफत प्रवेश दिला जाईल. ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. फूड-फन-फॅ मिली असा तिहेरी आनंद देणाºया या महोत्सवाला नक्की भेट द्या. सृष्टी हॉटेल, अ‍ॅग्रो टुरिझम अ‍ॅण्ड नर्सरी हे असोसिएट पार्टनर आहेत. भाग्यविजय, अभिनव इंटरनॅशनल स्कूल, कुचिना दरक डिस्ट्रिब्युटर्स, एक्सप्रेसो कॉफी हे या उत्सवाचे सहप्रायोजक आहेत. संदीप साऊंड म्युझिकल ग्रुपच्या राहुल चोथमल, कुणाल वराळे, प्रीती सामंत, प्रिया नरवडे या गायकांनी, तसेच रवी प्रधान, महेंद्र नरवडे, अभय सामंत, योगेश तुपे, योगेश कांबळे, अल्कित नरवडे या वाद्यवृंदांनी कार्यक्रमात रंगत
आणली.

Web Title: Enthusiasm everywhere in 'Lokmat Rangilo Dandiya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.