पर्यटन वाढीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:38 PM2019-07-19T23:38:43+5:302019-07-19T23:38:50+5:30
औरंगाबादच्या पर्यटन विकासासाठी पर्यटन संस्कृती निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी जन चळवळ उभारणे गरजेचे आहे.
वाळूज महानगर : औरंगाबादच्या पर्यटन विकासासाठी पर्यटन संस्कृती निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी जन चळवळ उभारणे गरजेचे आहे. या चळवळीसाठी येथील उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी बजाजनगर येथे केले.
बजाजनगरमध्ये मासिआ तर्फे भरविण्यात येणाऱ्या औद्योगिक प्रदर्शनानिमित्त पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावले यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. रावल यांनी पर्यटन विकासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.
औरंगाबादच्या पर्यटन विकासासाठीही ठोस निर्णय घेतले असून, अजिंठा-वेरुळ बरोबरच दौलताबाद किल्ल्याचा विकास केला जाणार आहे. मिटमिटा येथे झू-पार्क उभारले जाणार आहे. पर्यटनाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पर्यटन स्थळांचा नकाशा बनवून त्यावर सर्व माहिती दिली जाणार आहे. पर्यटकांसाठी विशेष बसची सुविधा केली जाणार आहे. विशेष म्हणजे उद्योजकांच्या होणाºया विविध बैठका, कार्यशाळा पर्यटनस्थळ असलेल्या अजिंठा, वेरुळ येथे घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. मात्र, देशाच्या अर्थव्यवस्थेचे भागीदार असलेल्या उद्योजकांशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे येथील उद्योजकांनी पर्यटन विकासाठी पुढाकार घेवून राज्य व देश विकासाला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.
औद्योगिक प्रदर्शनाला आंतरराष्ट्रीय उत्पादकांना आणण्यासाठी उच्चायुक्तांच्या मदतीने प्रयत्न करु. तसेच प्रदर्शनात येणाºया अभ्यागतांना, उद्योजकांना पर्यटन स्थळावर जाण्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. करमणुकीसाठी सायंकाळी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यासाठी पर्यटन विभाग मासिआला पूर्ण मदत करेल असे सांगून स्थानिक अधिकाऱ्यांना मदत करण्याचे निर्देश दिले.
यावेळी उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी अजिंठा रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे सांगून उद्योगासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तत्पूर्वी मंत्री रावल यांनी मासिआ सभागृहातील औद्योगिक उत्पादन प्रदर्शन गॅलरीला भेट देवून विविध यंत्र-सामुग्रीची माहिती घेतली.