उद्योजकांनी केली यंत्राची पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 06:02 PM2018-10-18T18:02:28+5:302018-10-18T18:03:23+5:30
वाळूज औद्योगिकनगरीत दसरा सणाचे औचित्य साधत उद्योजकांनी कारखान्यातील यंत्र व मशिनरीची पूजा करुन कामगारांना मिठाईचे वाटप करीत दसऱ्यांच्या शुभेच्छा दिल्या.
वाळूज महानगर : वाळूज औद्योगिकनगरीत दसरा सणाचे औचित्य साधत उद्योजकांनी कारखान्यातील यंत्र व मशिनरीची पूजा करुन कामगारांना मिठाईचे वाटप करीत दसऱ्यांच्या शुभेच्छा दिल्या.
वाळूज औद्योगिकनगरीत लहान-मोठे जवळपास तीन हजार कारखाने असून, या कारखान्यात कामगार मोठ्या संख्येने काम करतात. दसरा सणाचे औचित्य साधून औद्योगिकनगरीतील उद्योजक व अधिकाºयांनी दोन दिवसांपूर्वीच कामगारांच्या मदतीने कारखान्यातील यंत्र सामुग्री तसेच मशिनरीची स्वच्छता केली होती. मोठ्या कंपन्यात बुधवारीच कंपनीतील अधिकाºयांनी मशिनरीची पूजा केली होती.
गुरुवारी दसरा सणाच्या दिवशी लहान उद्योग असलेल्या उद्योजकांनी कुुटुंबियांना सोबत घेऊन उद्योगाची भरभराट होण्यासाठी कारखान्यातील यंत्र सामुग्री व मशनरीची पुजा केली. दसरा सणानिमित्त बहुताश कारखान्याकडून कामगारांना पगारी सुट्टी देण्यात आली होती. काही कारखान्यातील मशनरी बंद ठेवणे शक्य नसल्यामुळे मोजक्याच व तज्ज्ञ कामगारांनी कारखान्यात हजेरी लावली होती. सकाळी मशनरीची पुजा झाल्यानंतर उद्योजकाकडून उपस्थित कामगारांना आपट्याची पाने देऊन दसरा सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
याच बोरबर उद्योगनगरीतील ट्रॉन्सपोर्ट तसेच इतर व्यवसायिकांनी पुजा करुन उद्योग व व्यवसाय भरभराटीस येण्यासाठी भगवंताकडे प्रार्थना केली. दसरा सणासाठी कारखान्याकडून सुट्टी दिल्यामुळे कामगारांनी कुटुंबियाना सोबत घेत या परिसरातील बाजारपेठेत खरेदीचा आनंद लुटला.