वृक्षतोड, प्रदूषणामुळे पर्यावरणाचा होतोय ऱ्हास

By Admin | Published: June 5, 2016 12:03 AM2016-06-05T00:03:32+5:302016-06-05T00:39:07+5:30

बीड : गेल्या चार वर्षांपासून असलेली अवर्षणाची परिस्थिती ही केवळ पर्यावरण ऱ्हासामुळे झाली आहे. बेसुमार वृक्षतोड व प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत चालला आहे.

Environmental degradation due to tree pollution, pollution | वृक्षतोड, प्रदूषणामुळे पर्यावरणाचा होतोय ऱ्हास

वृक्षतोड, प्रदूषणामुळे पर्यावरणाचा होतोय ऱ्हास

googlenewsNext


बीड : गेल्या चार वर्षांपासून असलेली अवर्षणाची परिस्थिती ही केवळ पर्यावरण ऱ्हासामुळे झाली आहे. बेसुमार वृक्षतोड व प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत चालला आहे.
येथील डॉ. संजय जानवळे यांनी पर्यावरण दिनानिमित्त विविध बाबी मांडल्या. जागतिक तापमान वाढ होत असल्याचा परिणाम आपल्या देशातही जाणवत आहे. शहर तसेच ग्रामीण भागातून पक्षी, प्राण्यांची संख्या कमी होत असून, प्राचीन वृक्षजातीही कमी होत आहे. भारतासारख्या विकसनशील देशात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दाट लोकवस्ती, सांडपाणी व टाकाऊ पदार्थाच्या विल्हेवाटीची अपुरी सोय असल्याने मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या ७५ वर्षात मानवाने ८५ हजाराहून अधिक कृत्रिम रसायने विकसित केली. बहुसंख्य रसायने अस्तित्वात नव्हती. त्याचा वापर कपडे, बांधकाम साहित्य, अन्न वेष्टनात, सौंदर्य प्रसाधने, खेळणी अशा विविध ठिकाणी वापरली जात आहेत. त्याचा अनिष्ट परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. दिवसेंदिवस ही समस्या गंभीर बनत असून, वृक्ष लागवड हा उपाय असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Environmental degradation due to tree pollution, pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.