ईपीएस-९५ पेन्शनधारकांचा गुरुवारी दिल्लीत धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:15 AM2017-12-05T00:15:13+5:302017-12-05T00:15:20+5:30

आपल्या विविध मागण्यांकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. रामलीला मैदान ते संसद भवन, दिल्ली असा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

 EPS-95 pensioners face a protest rally in Delhi on Thursday | ईपीएस-९५ पेन्शनधारकांचा गुरुवारी दिल्लीत धडक मोर्चा

ईपीएस-९५ पेन्शनधारकांचा गुरुवारी दिल्लीत धडक मोर्चा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आपल्या विविध मागण्यांकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. रामलीला मैदान ते संसद भवन, दिल्ली असा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चात सहभागी होण्यासाठी अनेक जण दिल्लीकडे रवाना झाले. यात अ‍ॅड. सुभाष देवकर, जी. व्ही. गाडेकर, दीपक देशपांडे, सांडू मन्सुरी, शेख शफी, व्ही. आर. चव्हाण, आर. टी. कळसकर, बळीराम पाठे, अरुण देवकर, नाना निंबाळकर, उत्तम गायकवाड, उत्तम गावंडे, अ‍ॅड. कृष्णा जाधव, लालमिया शहा, विजय तायडे, माधुरी जोशी, शारदा देवकर, जयश्री पहाडे, दीपक देशपांडे, भागवत वारभुवन, डी. एम. पाटील आदींचा समावेश आहे. महागाई भत्त्यासह दहमहा पेन्शन ७ हजार ५०० रु. करण्यात यावी, कोशियारी समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पूर्ण पगारावर पेन्शन मंजूर करण्यात यावी, पेन्शनधारकांना पती-पत्नीसह मोफत वैद्यकीय सुविधा मंजूर करण्यात याव्यात, आदी मागण्या यानिमित्ताने करण्यात आल्या आहेत.

Web Title:  EPS-95 pensioners face a protest rally in Delhi on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.