अंतरवाली सराटी येथील सभेसाठी खुलताबाद येथून शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 04:19 PM2023-10-13T16:19:27+5:302023-10-13T16:19:40+5:30
या सभेसाठी राज्यभरातून मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.
खुलताबाद : अंतरवाली सराठी येथे उद्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची सभा होत आहे. या सभेसाठी खुलताबाद येथील शिल्पकार स्वाती सांळुके, नरेंद्र सांळुके या दाम्पत्याने तयार केलेला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पुजनासाठी नेण्यात आला आहे.
खुलताबाद येथील शिल्पकार दाम्पत्य स्वाती व नरेंद्र साळुंके यांचे सतकुंडा आर्ट स्टुडिओ असून या ठिकाणी विविध महापुरूषांचे पुतळ्यांची निर्मिती केली जाते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराठी येथे शनिवारी (दि.१४) सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरातून मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. सभेच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पुजनासाठी नेण्यात येणार आहे. हा पुतळा खुलताबाद येथील शिल्पकार स्वाती व नरेंद्र सांळुके यांच्या स्टुडिओतून आज सकाळी महापुजा करून रवाना झाला.