वीज तारांचे घर्षण होऊन एकरभर ऊस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:05 AM2021-02-27T04:05:16+5:302021-02-27T04:05:16+5:30

सफियाबादवाडी येथील पोपटराव रंगनाथ जाधव यांनी त्यांच्या शेतात उसाची लागवड केलेली आहे. हा ऊस तोडणीला आला होता. या शेताच्या ...

Erosion of sugarcane due to friction of power lines | वीज तारांचे घर्षण होऊन एकरभर ऊस खाक

वीज तारांचे घर्षण होऊन एकरभर ऊस खाक

googlenewsNext

सफियाबादवाडी येथील पोपटराव रंगनाथ जाधव यांनी त्यांच्या शेतात उसाची लागवड केलेली आहे. हा ऊस तोडणीला आला होता. या शेताच्या जवळून महावितरण कंपनीच्या विजेच्या तारा गेल्या आहेत. या तारांचे शॉर्ट सर्किट होऊन सुरुवातीला उसाच्या पाचटाला आग लागली. यानंतर संपूर्ण ऊस आगीच्या भक्षस्थानी पडून जळून खाक झाला. उसासोबत ठिबक संचही जळून गेल्याने शेतकरी जाधव यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. खांबावरील विद्युत तारा शेतात लोंबकळत आहेत. याबाबत वायरमनला वेळोवेळी कळवूनही त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडली असून महावितरण कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी जाधव यांनी केली आहे.

फोटो : सफियाबादवाडी येथील शेतकऱ्याचा जळून गेलेला ऊस.

260221\babasaheb radhakishan dhumal_img-20210222-wa0095_1.jpg

सफीयाबादवाडी येथील शेतकऱ्याचा जळून गेलेला ऊस.

Web Title: Erosion of sugarcane due to friction of power lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.