वाळू तस्करी रोखण्यासाठी ७ फिरत्या पथकांची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:25 AM2018-02-22T01:25:27+5:302018-02-22T01:25:30+5:30
पैठण तालुक्यातील गोदावरी पात्रातून होणारे वाळूचे अवैध उत्खनन व वाहतुकीला पायबंद करण्यासाठी तहसीलदारांनी सात फिरत्या पथकांची स्थापना केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : पैठण तालुक्यातील गोदावरी पात्रातून होणारे वाळूचे अवैध उत्खनन व वाहतुकीला पायबंद करण्यासाठी तहसीलदारांनी सात फिरत्या पथकांची स्थापना केली आहे. रविवार ते सोमवार दरम्यान कायमस्वरूपी हे पथक गौण खनिजांच्या वाहतूक व उत्खनन करणाºयांवर कारवाई करणार आहे.
पैठण तालुक्यातील वाळुपट्ट्याचा लिलाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तीन वेळा लिलाव आयोजित केला, परंतु या लिलावाकडे वाळू ठेकेदारांनी पाठ फिरवली. वाळू पट्ट्याचा लिलाव झालेला नसताना पैठण तालुक्यातून गोदावरीच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणावर वाळूचोरी सुरू आहे. या प्रकाराने शासनाचा दररोज महसूल बुडत आहे.
सोमवारी नायब तहसीलदार आनंद बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी सुद्रीक, सांगळे, गाडे, नितीन जाधव, शिवाजी गायकवाड, भागवत कसाब यांचे पथक कार्यान्वित राहणार आहे. मंगळवारी नायब तहसीलदार एन.एस. फोलाने यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी गोसावी, गोजरे, ढोरमारे, सतिश घावट, संतोष जाधव व दिपक नवगिरे यांचे, बुधवारी नायब तहसीलदार उदय मानवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी राजपूत, शेख, वाघ, सागर गांगवे, अनिल मिसाळ, दशरथ मिसाळ यांचे, गुरूवारी नायब तहसीलदार पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी मानघरे, आठवले, सरोदे, जितेंद्र जाधव, अर्जुन जाधव, राम घुले यांचे, शुक्रवारी मंडळ अधिकारी शैलेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी राठोड, फटांगडे, पुपले, आंबेकर, अनिल घोडके, दादासाहेब एडके यांचे, शनिवारी मंडळ अधिकारी संभाजी थोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी जमादार, हुग्गे, बोंद्रे, घुगे, अनिल हातागळे, अनिल दळवे यांचे व रविवारी मंडळ अधिकारी सुखानंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी तारडे, जोशी , महालकर,शेट्टी, कोल्हे, बिडवे यांचे पथक कारवाई करणार आहे.
पथकासोबत सशस्त्र पोलीस
या पथकासोबत दररोज दोन सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त देण्यात येणार असून बंदोबस्त देण्याबाबत पोलीस निरीक्षक चंदन ईमले यांना पत्र दिले आहे, असे तहसीलदार महेश सावंत यांनी सांगितले. पथकासोबत सशस्त्र पोलीस बंदोबस्त देण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक चंदन ईमले यांनी सांगितले.