ग्राम संवाद सरपंच संघाची स्थापना,अजिनाथ धामणे प्रदेशाध्यक्षपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:06 AM2021-05-05T04:06:37+5:302021-05-05T04:06:37+5:30
महाराष्ट्रातील सरपंच, उपसरपंच एकत्रित येऊन संवाद घडावा आणि त्यातून गावातील विविध प्रश्न, समस्या सुटाव्यात यासाठी या संघाची स्थापना ...
महाराष्ट्रातील सरपंच, उपसरपंच एकत्रित येऊन संवाद घडावा आणि त्यातून गावातील विविध प्रश्न, समस्या सुटाव्यात यासाठी या संघाची स्थापना करण्यात आल्याचे धामणे यांनी स्पष्ट केले. आगामी काळात विविध मार्गदर्शन शिबिरे, व्याख्याने यासह संघाचे अधिवेशन घेऊन ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तींचा सुसंवाद घडवून आणण्याचा आमचा मानस असल्याचे ते म्हणाले.
खालील कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली आहे.
उपाध्यक्ष- प्रमोद भगत, सचिव- विशाल लांडगे, महिला संपर्क प्रमुख- पुष्पा शिंदे, प्रवक्ता -भाऊसाहेब काळे, मराठवाडा -अध्यक्ष किरण घोंगडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष- राहुल घाडगे, विदर्भ अध्यक्ष -दिगंबर धानोरकर, संपर्क प्रमुख -संदीप धांडे, प्रसिद्धी प्रमुख -अजितसिंग राजपूत, सोशल मीडिया प्रमुख- कृष्णा काजळे, संघटक -सुरेश बडे, कायदेशीर सल्लागार- परमेश्वर इंगोले, सल्लागार -कविता भगत, शिवदास पाटील.