वाळूज उद्योगनगरीत युवा कामगार संघटनेची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:02 AM2021-08-28T04:02:11+5:302021-08-28T04:02:11+5:30
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसील हिट ट्रीटमेंट या कंपनीत युवा कामगार संघटनेची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. युवा कामगार ...
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसील हिट ट्रीटमेंट या कंपनीत युवा कामगार संघटनेची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. युवा कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या नामफलकाचे अनावरण संस्थापक सचिव अरुण पाटील, राज्य सहसचिव संतोष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अविनाश घाटे, जी. बी. शिरसाठ, डी. जे. नागरे, राजू मुजावर, नानासाहेब तुपे, स्वामी भागेकर, राजू मुंढे, रामहरी ढोले आदीसह कामगारांची उपस्थिती होती.
रांजणगावात रविवारी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा नागरी सत्कार
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथे रविवारी (दि.२९) नवनिर्वाचित केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा नागरी सत्कार सोहळा व विविध शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रांजणगाव-वाळूज रस्त्यावरील हरिसिद्धी लॉन्स येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. प्रशांत बंब तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच कांताबाई जाधव, जि.प. सदस्या उषा हिवाळे, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, पंचायत समिती सदस्या पुष्पा दळवी आदींची उपस्थिती राहणार आहे.