अंदाजे करवसुली

By Admin | Published: February 23, 2016 12:33 AM2016-02-23T00:33:53+5:302016-02-23T00:33:53+5:30

पुरूषोत्तम करवा , माजलगाव शहरातील ४० टक्के घरांची पालिकेत साधी नोंदही नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नळजोडणीच्या बाबतीतही याहून वेगळी स्थिती नाही.

Estimated Tax Recovery | अंदाजे करवसुली

अंदाजे करवसुली

googlenewsNext


पुरूषोत्तम करवा , माजलगाव
शहरातील ४० टक्के घरांची पालिकेत साधी नोंदही नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नळजोडणीच्या बाबतीतही याहून वेगळी स्थिती नाही. त्यामुळे करवसुलीला अडचणी येत आहेत. पालिका कर्मचाऱ्यांकडून घर, नळांच्या नोंदी नसतानाही अंदाजे करवसुली सुरू आहे.
५० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पालिकेकडे सध्या शहरातील ९ हजार १३ घरांची नोंद आहे. गेल्या काही वर्षांत शहर चोहोबाजूने झपाट्याने वाढले. त्यामुळे घरांची संख्या १५ हजारांहून अधिक आहे. पालिका दप्तरी नोंद असलेल्या घरांची संख्या केवळ ९ हजार एवढी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कर बुडत आहे. याचा फटका पालिका व शासनालाही सहन करावा लागत आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे पालिकेकडे नळ जोडणीची संख्या अवघी ४५०० इतकी आहे. यात अर्धा इंचाचे १ हजार ९०० तर पाऊण इंचाचे २ हजार ६०० जोडण्यांची नोंद आहे. व्यवसायिकांच्या नावे केवळ ५० जोडण्या दाखवल्या आहेत. शहरात दोनशे ते आडीचशे व्यवसायिकांनी मुख्य पाईपलाईनमधून जोडण्या घेतल्या आहेत. राजकीय पुढाऱ्यांच्या घरातील पाण्याच्या नळांची तर पालिकेत साधी नोंदही नाही. जवळपास ६० टक्के नळ जोडण्या अनाधिकृत आहेत.
दीड वर्षांपासून सर्व्हे सुरू
शहरातील घरांची व नळांची संख्या किती ? याचा शोध पालिकेकडून सुरू आहे. त्यासाठी कर्मचारी नेमले आहेत. मात्र, दीड वर्षापूर्वी सुरू केलेले सर्व्हेचे काम अद्याप पूर्ण नाही. त्यामुळे पालिकेचा कोट्यवधींचा कर बुडत आहे.

Web Title: Estimated Tax Recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.