मालमत्ता करासाठी नीतिमत्ता गहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 01:14 AM2017-09-20T01:14:30+5:302017-09-20T01:14:30+5:30

महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाºयांनी मंगळवारी ‘पारदर्शक’ कारभाराचा उत्कृष्ट नमुना सादर केला

Ethics sold for property tax | मालमत्ता करासाठी नीतिमत्ता गहाण

मालमत्ता करासाठी नीतिमत्ता गहाण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाºयांनी मंगळवारी ‘पारदर्शक’ कारभाराचा उत्कृष्ट नमुना सादर केला. शहरातील मालमत्तांना कर लावणे आणि वसुलीच्या खाजगीकरणाचा ठराव चक्क दोन महिन्यांपूर्वी सर्वसाधारण सभेत गुपचूप पद्धतीने मंजूर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा अशासकीय ठराव ऐनवेळीमध्ये कधी मंजूर झाला, हे कोणालाच माहीत नाही. शिवसेनेसह एमआयएमने विरोधाचे शस्त्र बाहेर काढताच महापौरांसह काही भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार समर्थन केले. या राड्यात सर्वसाधारण सभा गुंडाळण्यात आली.
मंगळवारी सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेतील विविध ठराव मंजूर झाल्यानंतर माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी मालमत्ता कराच्या वसुलीचे खाजगीकरण ऐनवेळीत करू नका, सभागृहासमोर हा ठराव ठेवावा, अशी मागणी केली.

Web Title: Ethics sold for property tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.