पर्यवेक्षीय यंत्रणेच्या कामांचे होणार मूल्यमापन
By Admin | Published: October 19, 2014 12:07 AM2014-10-19T00:07:46+5:302014-10-19T00:21:05+5:30
भूम : येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘गतिमान व कार्यक्षम प्रशासन’ प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत असून, याअंतर्गत पर्यवेक्षिय यंत्रणेच्या कामांचे पारदर्शी
भूम : येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘गतिमान व कार्यक्षम प्रशासन’ प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत असून, याअंतर्गत पर्यवेक्षिय यंत्रणेच्या कामांचे पारदर्शी व वस्तुनिष्ठ मुल्यांकन करण्यात येऊन त्याआधारे गोपनीय अहवाल लिहिले जाणार आहेत.
तालुक्यात जिल्हा परिषद आणि खाजगी अशा १७१ शाळा असून, शाळांसोबतच पर्यवेक्षीय काम पाहणारे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्या कामात गतिमानता येण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. याअंतर्गत वेगवेगळ्या दहा मुद्यांची तपासणी करून त्यानुसार शंभर पैकी गुण दिले जाणार असून, या गुणांवर त्यांची गुणवत्ता निश्चित केली जाणार आहे. यात ८१ ते १०० गुण घेणाऱ्यास ‘अ’ ेणी, ७१ ते ८० गुणांसाठी ‘ब’, ६१ ते ७० साठी ‘क’ तर ५१ ते ६० गुणांसाठी ‘ड’ श्रेणी निश्चित केली जाणार आहे.
सदर गुणांकन हे मानके, माझी समृध्द शाळा, ई-लर्निंग आणि डिजीटल स्कूल, पर्यवेक्षिय यंत्रणेकडून झालेल्या शाळा तपासणी व भेटी आदी बाबी तपासल्या जाणार आहेत. याशिवाय पर्यवेक्षिय यंत्रणेची वरिष्ठ कार्यालयास अचूक व वेळेवर माहिती देणे याही मुद्यावर तपासणी केली जाणार असून, यात प्रामुख्याने विद्यार्थी लाभाच्या योजनांची अंमलबजावणी, अचूक यू डायस माहिती भरणे, नवोपक्रम, लेखा आक्षेप पूर्तता या मुद्यांना प्रत्येकी दोन गुण दिले जाणार आहेत. तसेच कोणत्या केंद्रातील अथवा शाळेतील किती विद्यार्थी शिष्यवृत्ती तसेच नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झाले, याच्या टक्केवारीनुसारही गुण दिले जाणार आहेत. याशिवाय नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या ‘कन्या सुरक्षा कवच’ या उपक्रमालाही या मुल्यांकनात दहा गुण दिले जाणार आहेत.
यात प्रामुख्याने शायांचा सहभाग, प्रभावी अंमलबजावणी, वरिष्ठ कार्यालयाने सूचविल्याव्यतिरिक्त केंद्राने तसेच बीटने कार्यान्वित केलेले उपक्रम आणि फोटोसह अहवाल या मुद्यांचा समावेश राहणार आहे. (वार्ताहर)