सोने पळविल्याचे समजल्यानंतरही व्यवस्थापकावर का ठेवला विश्वास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 07:04 PM2019-07-05T19:04:48+5:302019-07-05T19:06:49+5:30

आरोपींविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यासाठी तब्बल सहा महिने का लावले, असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे.

Even after knowing about gold theft, why did he trust the manager? | सोने पळविल्याचे समजल्यानंतरही व्यवस्थापकावर का ठेवला विश्वास?

सोने पळविल्याचे समजल्यानंतरही व्यवस्थापकावर का ठेवला विश्वास?

googlenewsNext
ठळक मुद्देविश्वनाथ पेठे यांनी डिसेंबर २०१८ मध्ये दुकानाला भेट दिली तेव्हाच चोरी उघडकीस जैन कुटुंबास दुकानात प्रत्यक्ष बोलावून घेत दागिन्याविषयी विचारले होते.

औरंगाबाद : व्यवस्थापक अंकुर राणे याने विश्वासघात करून दुकानातील ५८ किलो सोन्याचे दागिने ग्राहक राजेंद्र जैन, भारती जैन आणि लोकेश जैन यांना दिल्याचे सुवर्णपेढीचे भागीदार मालक विश्वनाथ पेठे यांना गतवर्षी डिसेंबर महिन्यातच समजले होते. पेठे यांनी आरोपींविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यासाठी तब्बल सहा महिने का लावले, असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे.

समर्थनगरातील वामन हरी पेठे ज्वेलर्सचे भागीदार विश्वनाथ पेठे यांनी डिसेंबर २०१८ मध्ये दुकानाला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी दुकानातील हिशेब आणि स्टॉक मालाची तपासणी केली असता ५८ किलो सोन्याचे दागिने कमी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांनी राणेकडे चौकशीही केली.हे दागिने ग्राहक राजेंद्र जैन, भारती जैन आणि लोकेश जैन यांना दिल्याचे त्याने सांगितले होते. त्यावरून जैन कुटुंबास दुकानात प्रत्यक्ष बोलावून घेत त्यांनी नेलेल्या दागिन्याविषयी विचारले होते. त्यांनी लवकरच सोने आणून देतो, असे सांगितल्याचे विश्वनाथ पेठे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस विविधागांनी तपास करीत आहेत. 

औरंगाबादेतील वामन हरी पेठे ज्वेलर्समधील ५८ किलो सोन्यावर नोकरानेच घातला दरोडा

दाखविण्यासाठी घरी दिले ५८ किलो सोन्याचे दागिने 
सुवर्णपेढीतून ग्राहकांना दागिने दाखविण्यासाठी दिले जात नाहीत, असा दुकानाचा नियम आहे. तरीही जैन कुटुंबियांना दाखविण्यासाठी दिलेला ५८ किलोचे सुवर्णलंकार त्यांनी परत आणून दिले नसल्याचे राणे याने पेठे यांना सांगितले होते. त्याच्या सांगण्यावर दुकानमालकांनी विश्वास कसा ठेवला?दुकानातून एवढे मोठे दागिने दाखविण्यास दिले गेले असावे, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. नियम मोडून विश्वासघाताने दुकानाबाहेर दागिने पाठविणाऱ्या राणेकडे एप्रिल महिन्यात त्या दागिन्याविषयी विचारणा करण्यात आली आणि २० मे रोजी पोलिसांत तक्रार देण्यात आली.

अशी केली दोन वर्षांत ५८ किलो सोन्याची हेराफेरी

तिघांना मिळाली पोलीस कोठडी
येथील वामन हरी पेठे या सुवर्णपेढीतून ५८ किलो सोने लांबविल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेले अंकुर राणे, राजेंद्र जैन आणि लोकेश जैन या तिघांना गुरुवारी (दि.४ जुलै) मुख्य न्यायदंडाधिकारी एम.ए. मोटे यांनी ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Even after knowing about gold theft, why did he trust the manager?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.