उन्हाळा संपला तरी सिडको-हडकोत आठ दिवसांनंतरही पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 11:17 PM2019-07-02T23:17:27+5:302019-07-02T23:17:53+5:30

जायकवाडीत पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. जेमतेम ११० एमएलडी पाणी दररोज शहरात आणण्यासाठी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच सिडको-हडकोतील नागरिकांना आठ दिवसांनंतरही पाणी मिळायला तयार नाही. उन्हाळा संपला तरी सिडको-हडकोतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात मनपाला यश आलेले नाही.

Even after summer, CIDCO and Hudkot still have no water after eight days | उन्हाळा संपला तरी सिडको-हडकोत आठ दिवसांनंतरही पाणी नाही

उन्हाळा संपला तरी सिडको-हडकोत आठ दिवसांनंतरही पाणी नाही

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांचा संताप : नगरसेवकाने टँकरचा पाणीपुरवठा बंद पाडला

औरंगाबाद : जायकवाडीत पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. जेमतेम ११० एमएलडी पाणी दररोज शहरात आणण्यासाठी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच सिडको-हडकोतील नागरिकांना आठ दिवसांनंतरही पाणी मिळायला तयार नाही. उन्हाळा संपला तरी सिडको-हडकोतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात मनपाला यश आलेले नाही. मंगळवारी सकाळी नगरसेवक नितीन चित्ते यांनी एन-५ पाण्याच्या टाकीवर धाव घेऊन टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद पाडला.
सिडको-हडकोत मागील चार महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना आठ ते दहा दिवसांनंतर पाणी मिळत आहे. उन्हाळ्यात या भागातील नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला. पाण्यासाठी एन-५, एन-७ येथील जलकुंभावर अनेकदा आंदोलनेही झाली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला सिडको-हडकोकडे लक्ष देता आले नाही. मंगळवारी पुन्हा एकदा नगरसेवक नितीन चित्ते यांनी आंदोलन केले. वॉर्डात आठ दिवसांनंतरही पाणी न आल्याने त्यांनी एन-५ येथील जलकुंभावर धाव घेतली. नागरिकांना पाणी न देता टँकर का भरले जात आहेत? म्हणून त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी टँकरचा पाणीपुरवठा बंद पाडला.

Web Title: Even after summer, CIDCO and Hudkot still have no water after eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.