लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 03:21 PM2021-03-13T15:21:20+5:302021-03-13T15:23:05+5:30

corona virus एखादा ऑक्सिजन बेड वाया घालविण्यापेक्षा तो गरजू रुग्णाला मिळाला पाहिजे, यासाठी खाजगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

Even after taking two doses of the vaccine, the din of the government hospital was corona positive | लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता कोरोना पाॅझिटिव्ह

लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता कोरोना पाॅझिटिव्ह

googlenewsNext
ठळक मुद्देगोरगरीब गंभीर रुग्णांना बेड मिळण्यासाठी उपचारासाठी खाजगीत दाखल

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे त्यांनी दोन डोस घेतले होते, त्यानंतरही त्यांचा कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

डाॅ. कानन येळीकर यांनी ३० जानेवारी रोजी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर दहा दिवसांपूर्वीच त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. दरम्यान, ११ मार्च रोजी त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवली. त्यामुळे त्यांनी कोरोना तपासणी केली. त्याचा अहवाल शुक्रवारी कोरोना पाॅझिटिव्ह आला. उपचारासाठी त्यांना घाटीत दाखल करण्यात येणार होते. मात्र, घाटीत ऑक्सिजन खाटा आहेत. कारण येथे गंभीर रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. डाॅ. येळीकर यांना कोणताही त्रास नाही. एखादा ऑक्सिजन बेड वाया घालविण्यापेक्षा तो गरजू रुग्णाला मिळाला पाहिजे, यासाठी खाजगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार त्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन डाॅ. येळीकर यांनी केले आहे.

लसीकरणामुळे गंभीर लक्षणे टळण्यास मदत
कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर साधारणपणे २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. हा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ ते १५ दिवसांनी अँटिबाॅडीज तयार होतात. त्यातून गंभीर लक्षणे टळतात. त्यामुळे लसीचा निश्चितच फायदा होत असल्याचे घाटीतील लसीकरण अधिकार्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Even after taking two doses of the vaccine, the din of the government hospital was corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.