‘स्पॉट ॲडमिशन’ फेरीनंतरही मराठवाड्यात इंजिनिअरिंगच्या ३ हजारांवर जागा रिक्त

By योगेश पायघन | Published: November 22, 2022 12:25 PM2022-11-22T12:25:40+5:302022-11-22T12:26:52+5:30

अभियांत्रिकीचे १३.३५ टक्के प्रवेश वाढले, तरी ३५.५१ टक्के जागा रिक्त

Even after the 'spot admission' round, 3,000 engineering seats are vacant in Marathwada | ‘स्पॉट ॲडमिशन’ फेरीनंतरही मराठवाड्यात इंजिनिअरिंगच्या ३ हजारांवर जागा रिक्त

‘स्पॉट ॲडमिशन’ फेरीनंतरही मराठवाड्यात इंजिनिअरिंगच्या ३ हजारांवर जागा रिक्त

googlenewsNext

औरंगाबाद : अभियांत्रिकी पदवी (बीई, बीटेक) प्रथम वर्ष प्रवेशाची ३ कॅप राऊंड, स्पाॅट अडमिशन नंतरही मराठवाड्यातील २७ अभियांत्रिकी महाविद्यालयांत ३ हजार ३५१ जागा रिक्त राहील्या आहेत. यावर्षी ६ हजार ८४ जागांवर प्रवेश निश्चित झाले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी १,९९२ (१३.३५ टक्के) प्रवेश वाढले. तरीही ३५.५१ टक्के जागा रिक्त राहील्या आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये २८ महाविद्यालयात ८ हजार ३ जागांपैकी ४ हजार ९१ जागांवर प्रवेश निश्चित होऊन ३ हजार ९११ (४८.८६ टक्के) जागा रिक्त होत्या. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल १,९९२ प्रवेश वाढले. मराठवाड्यातील २७ अभियांत्रिकी महाविद्यालयात ९ हजार ४३५ जागांपैकी ६ हजार ८४ प्रवेश निश्चित झाले. ३ हजार ३५१ जागा अद्याप रिक्त आहेत. संस्थास्तरावरील प्रवेशानंतरही या शैक्षणिक वर्षात ३५.५१ टक्के जागा रिक्त राहील्या आहेत. अभियांत्रिकीचे वर्ग ४ नोव्हेंबर पासून सुरू झाले असून डिसेंबर महिन्यात नव्याने प्रवेशित वगळून इतर वर्गांच्या प्रवेश परिक्षा सुरू होणार आहेत.

औरंगाबादमध्ये सर्वाधिक जागा रिक्त
सर्वाधिक रिक्त जागा औरंगाबाद जिल्ह्यात १००९, बीडमध्ये ६१६, जालना ११०, लातुर ६११, नांदेड ५८०, उस्मानाबाद ३११, परभणी ११४ अशा मंजुर जागांपैकी ३०६५ तर ईडब्ल्यूएसच्या २५६ तर टिएफडब्ल्यूएसच्या ३० अशा एकुण ३ हजार ३५१ जागा रिक्त राहील्या आहेत. सध्या संस्थास्तरावरील प्रवेश १३ ते २० नोव्हेंबरपर्यंत करण्यात आले. २१ नोव्हेंबर रोजी रिक्त जागांचे चित्र स्पष्ट झाले.

गेल्यावर्षीपेक्षा अधिक जागा रिक्त 
संस्थास्तरावरील प्रवेशानंतर मराठवाड्यातील २७ महाविद्यालयात ३ हजार ३५१ जागा मराठवाड्याती रिक्त आहेत. यावर्षी प्रवेशाचा टक्का गेल्यावर्षीपेक्षा वाढला असूनही ३५.५१ टक्के जागा रिक्त आहेत.
- उमेश नागदेवे, सहसंचालक, तंत्रशिक्षण विभाग, औरंगाबाद

अशी आहे रिक्त जागांची स्थिती
प्रवेशाची स्थिती -२०२१-२२ -२०२२-२३

महाविद्यालये -२८ -२७
प्रवेश क्षमता -८,००३ -९,४३५
प्रवेश -४०९२ -६,०८४
रिक्त जागा -३,९११ -३,३५१

Web Title: Even after the 'spot admission' round, 3,000 engineering seats are vacant in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.