अखेर पुंडलिकनगर पोलिसांनी नोंदविला कार चोरीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:36 AM2017-08-31T00:36:17+5:302017-08-31T00:36:17+5:30
सिडको एन-४ येथील माजी सैनिकाच्या कार चोरीप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी घटनेनंतर तब्बल १२ दिवस उशिराने २९ आॅगस्टला गुन्हा नोंदवून घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सिडको एन-४ येथील माजी सैनिकाच्या कार चोरीप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी घटनेनंतर तब्बल १२ दिवस उशिराने २९ आॅगस्टला गुन्हा नोंदवून घेतला. तक्रारदारांनाच आरोपीच्या पिंजºयात उभे करून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करणाºया पोलिसांच्या कामगिरीचे वृत्त ‘लोकमत’ने २४ आॅगस्ट रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी याप्रकरणी चौकशी करून तातडीने गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते.
सिडको एन-४ येथील माजी सैनिक कचरू त्र्यंबक अढागळे यांच्या घरासमोर उभी कार (क्रमांक एमएच-२० बीटी-६२६०) चोरट्यांनी १७ आॅगस्ट रोजी रात्री चोरून नेली. याप्रकरणी अढागळे यांनी दुसºया दिवशी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र, पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज हे ठाण्यात नसल्याने त्यांना दुसºया दिवशी बोलाविण्यात आले. दुसºया दिवशी त्यांचा तक्रार अर्ज घेण्यात आला. मात्र, तब्बल सात दिवसांनंतरही पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही. उलट तक्रारदारांनाच पोलिसांनी आरोपीच्या पिंजºयात उभे करून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच त्यांनी कारच्या कर्जाचे हप्ते न भरल्याने कार लपविली असावी, असा संशय व्यक्त केला.