अखेर पिसाळलेल्या वानरास केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:04 AM2021-06-25T04:04:52+5:302021-06-25T04:04:52+5:30
गारज : गेल्या पंधरा दिवसांपासून गारज गावात एका पिसाळलेल्या वानराने उच्छाद मांडला होता. अचानक घरात घुसणे, कपाटाच्या, खिडकीच्या काचा ...
गारज : गेल्या पंधरा दिवसांपासून गारज गावात एका पिसाळलेल्या वानराने उच्छाद मांडला होता. अचानक घरात घुसणे, कपाटाच्या, खिडकीच्या काचा फोडणे, अंगावर धावून जाणे या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. तर अनेक नागरिकांचे नुकसान केले. अखेर प्राणिमित्रांनी धाव घेऊन त्या वानरास गुरुवारी सकाळी जेरबंद केले.
नागद गावात मोठ्या प्रमाणात वानरांचा संचार वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो. सुमारे १०० ते १५० वानर गावातील घरांवर उच्छाद घालीत असल्याचे समोर आले. त्यापैकी एक वानर पिसाळलेले असल्याचे समोर आले. त्या पिसाळलेल्या वानराने अक्षरश: नागरिकांच्या तोंडचे पाणी हिसकावले. अंगावर धावून जाणे, काचा फोडणे या विचित्र प्रकाराने गावकऱ्यात भीती निर्माण झाली. दरम्यान, गारज ग्रामपंचायतीच्या वतीने वनविभागाला माहिती देत वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. अखेर अंभई येथील प्राणिमित्र समाधान गिरी, कृष्णा गिरी, संदीप गिरी यांनी धाव घेतली. गुरुवार सकाळी साडेसहा वाजता गावात पिंजरा लावून पिसाळलेल्या वानराला जेरबंद केले. त्यामुळे नागरिकांच्या जिवात जीव आला असून, गावातील अन्य वानरांचादेखील वनविभागाचे बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
----
फोटो : गारज येथे पंधरा दिवसांपासून उच्छाद मांडलेल्या वानरास जेरबंद करण्यात आले.
240621\pravin sahebrao nipane_img-20210624-wa0014_1.jpg
अखेर पिसाळलेल्या वानरास केले जेरबंद