अखेर त्या रुग्णवाहिका आरोग्य केंद्रांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:02 AM2021-09-17T04:02:27+5:302021-09-17T04:02:27+5:30
कन्नड तालुक्यातील चिकलठाण आणि चिंचोली लिंबाजी या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रुग्णांच्या सोयीसाठी गेल्या आठवड्यात आमदार फंडातून प्रत्येकी एक ...
कन्नड तालुक्यातील चिकलठाण आणि चिंचोली लिंबाजी या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रुग्णांच्या सोयीसाठी गेल्या आठवड्यात आमदार फंडातून प्रत्येकी एक रुग्णवाहिका मिळाली होती. संबंधित रुग्णवाहिका या त्या त्या केंद्रांवर पोहोचल्यासुद्धा. परंतु, त्यावर आमदारांचे नाव टाकण्यासाठी संबंधित रुग्णवाहिका नागदच्या पेट्रोल पंपावर बोलावून घेण्यात आल्या. या रुग्णवाहिका आमदार उदयसिंग राजपूत यांच्या स्थानिक विकास निधीतून असल्याने त्यांच्यावर तसा उल्लेख नव्हता. तो उल्लेख करण्यासाठी त्यांनी रुग्णवाहिका आठवडाभर आपल्या गावात थांबवून घेतल्या होत्या. नाव टाकण्यासाठी एक दिवसाचा वेळ पुरेसा होता. परंतु, आठवडाभरापासून त्या उभ्याच असल्याने तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरू झाली होती.
याबाबत ‘लोकमत’ने १६ सप्टेंबरच्या अंकात ‘आमदारांच्या नावासाठी खोळंबल्या दोन रुग्णवाहिका’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले हाेते. या वृत्ताची आमदार उदयसिंग राजपूत यांनी दखल घेत संबंधित रुग्णवाहिका कन्नड तालुक्यातील चिकलठाण आणि चिंचोली लिंबाजी या प्राथमिक आरोग्य केंद्रांना गुरुवारी पाठविल्या.
---- फोटो
160921\img-20210916-wa0121.jpg~160921\img-20210916-wa0120.jpg
रूग्णवाहिका~रूग्णवाहिका