गांजा वाहतुकीसाठी प्रत्येकाला मिळणार होती हजार रुपये प्रतिदिन मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:47 PM2019-07-17T23:47:06+5:302019-07-17T23:47:48+5:30

आंध्र प्रदेशातील राजमंडी येथून आणलेला सुमारे अर्धा क्विंटल गांजाचा साठा वैजापूर आणि शिर्डी येथे आरोपी नेत होते. ही वाहतूक करण्यासाठी आरोपींना प्रत्येकी हजार रुपये रोज मजुरी आणि प्रवासादरम्यान खाण्या-पिण्याचा खर्च मिळणार होता, अशी माहिती समोर आली. अटकेतील तीनपैकी एक आरोपी प्रथमच गांजा तस्करीत सहभागी झाला होता. मात्र, पुंडलिकनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना पकडले आणि लॉकअ‍ॅपमध्ये जावे लागले.

Everyone was going to get Rs. 1000 per day wages for transportation of hemp | गांजा वाहतुकीसाठी प्रत्येकाला मिळणार होती हजार रुपये प्रतिदिन मजुरी

गांजा वाहतुकीसाठी प्रत्येकाला मिळणार होती हजार रुपये प्रतिदिन मजुरी

googlenewsNext
ठळक मुद्देवैजापूर, शिर्डीला घेऊन जात होते गांजाचा साठा: तपास पथक जाणार आंध्र प्रदेशात

औरंगाबाद : आंध्र प्रदेशातील राजमंडी येथून आणलेला सुमारे अर्धा क्विंटल गांजाचा साठा वैजापूर आणि शिर्डी येथे आरोपी नेत होते. ही वाहतूक करण्यासाठी आरोपींना प्रत्येकी हजार रुपये रोज मजुरी आणि प्रवासादरम्यान खाण्या-पिण्याचा खर्च मिळणार होता, अशी माहिती समोर आली. अटकेतील तीनपैकी एक आरोपी प्रथमच गांजा तस्करीत सहभागी झाला होता. मात्र, पुंडलिकनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना पकडले आणि लॉकअ‍ॅपमध्ये जावे लागले.
औरंगाबाद आणि ग्रामीण भागात आंध्र प्रदेशातून चोरट्या मार्गाने गांजा आणला जातो. मात्र, बऱ्याचदा हा गांजा रेल्वेच्या मालवाहतूक करणाºया बोगीतून, तर कधी कुरिअरमार्गे येतो. मंगळवारी अलिशान कारमधून गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती खबºयाने पोलिसांना दिली आणि सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि त्यांच्या पथकातील पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून बीड बायपासवर सुमारे ४८ किलो गांजासह पोलुमल्ली दुर्गाप्रसाद अप्पाराव, दुर्गन रामेन लक्ष्मण आणि केडमी राकेश अप्पाराव (सर्व रा. आंध्र प्रदेश) यांना पकडले. आरोपींना न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीदरम्यान आरोपींनी धक्कादायक खुलासा केला आहे. गांजा वाहतूक करण्यासाठी आरोपींना प्रतिदिन हजार रुपये मजुरी आणि प्रवासादरम्यान खाण्या-पिण्याचा खर्च मिळणार होता. अटकेतील आरोपींपैकी पोलुमल्ली आणि दुर्गन रामेन हा सराईत तस्कर आहे. त्यांनी यापूर्वी अनेकदा औरंगाबाद आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत गांजाची वाहतूक केलेली आहे, तर आरोपी केडमी अप्पाराव हा पहिल्यांदाच गांजा तस्करांसोबत औरंगाबादेत आला अन् अडकल्याचे सपोनि सोनवणे यांनी सांगितले. आरोपी शिर्डी आणि वैजापूर येथे गांजाचा पुरवठा करणार होते. आरोपींना गांजाचा साठा देणाऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक आंध्र प्रदेशात जाणार आहे.

Web Title: Everyone was going to get Rs. 1000 per day wages for transportation of hemp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.