अवघड क्षेत्र निश्चितीच्या निकषांचे पुरावे जिल्हा परिषदेनेच मिळवावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:05 AM2021-05-05T04:05:56+5:302021-05-05T04:05:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कन्नड : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी अवघड क्षेत्र निश्चितीची प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून नुकतीच सुरू करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्नड : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी अवघड क्षेत्र निश्चितीची प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून नुकतीच सुरू करण्यात आली आहे. यासाठी शासनाकडून निश्चित केलेल्या विविध सात निकषांपैकी किमान तीन निकष पूर्ण करणाऱ्या शाळा अवघड क्षेत्रासाठी पात्र ठरविण्यात येणार आहेत.
अनेक शाळा अशा निकषाला पात्र आहेत, त्यांचे सबळ पुरावे मिळवण्यासाठी प्रशासनानेच असे प्रस्तावित शाळांचे पुरावे मागवून अवघड क्षेत्रातील शाळा निश्चिती सुकर करावी, अशी मागणी शिक्षक सेनेने केली आहे.
निकषास पात्र असूनही शाळांतील शिक्षकांना संबंधित कार्यालयात अनेक हेलपाटे मारूनही या कार्यालयाकडून शाळांना असे प्रमाणपत्र मिळवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. कारण सर्व वरील निकषांची प्रमाणपत्रे देणारी मुख्य कार्यालये ही जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्थानिक गटशिक्षणाधिकाऱ्यांना या अवघड क्षेत्रात नवीन निकषात बसणाऱ्या शाळांसाठी प्रमाणपत्रे देण्यास संबंधित कार्यालय प्रमुखांना तालुका स्तरावर पत्र देण्यासाठी सुचवले आहे. मात्र, बऱ्याच कार्यालय प्रमुखांशी चर्चा केली असता, त्यांनी असे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार त्यांना नसल्याचे प्रत्यक्ष भेटीत सांगितले. त्यामुळे जिल्हा स्तरावरूनच यावर कार्यवाही व्हावी, अशी मागणी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार, संपर्कप्रमुख प्रभाकर पवार, सदानंद माडेवार, भगवान हिवाळे, शशिकांत बडगुजर, महेश लबडे, कल्याण पवार, अनिल काळे, शिवाजी दुधे, आदींनी केली आहे.