माजी प्राचार्यांच्या दुसऱ्या पत्नीकडून अल्पवयीन मुलाचे शोषण;१० कोटींची मालमत्ता परस्पर विकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2022 01:10 PM2022-01-29T13:10:35+5:302022-01-29T13:11:08+5:30

एका माजी प्राचार्यांच्या पहिल्या पत्नीचे २०१५ मध्ये निधन झाले. त्यानंतर दुसऱ्या पत्नीने त्यांच्या बारा वर्षीय मुलाचे शोषण केले.

Ex-principal's second wife exploits minor child; sells property worth Rs 10 crore to each other | माजी प्राचार्यांच्या दुसऱ्या पत्नीकडून अल्पवयीन मुलाचे शोषण;१० कोटींची मालमत्ता परस्पर विकली

माजी प्राचार्यांच्या दुसऱ्या पत्नीकडून अल्पवयीन मुलाचे शोषण;१० कोटींची मालमत्ता परस्पर विकली

googlenewsNext

औरंगाबाद : एका माजी प्राचार्यांच्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करून त्यांची सुमारे दहा कोटींची मालमत्ता परस्पर विकण्यात आल्याच्या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा तसेच बारा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडित बारा वर्षीय मुलाच्या चुलत भावांनी निवेदनाद्वारे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्याकडे शुक्रवारी निवेदनाद्वारे केली.

एका माजी प्राचार्यांच्या पहिल्या पत्नीचे २०१५ मध्ये निधन झाले. त्यानंतर दुसऱ्या पत्नीने त्यांच्या बारा वर्षीय मुलाचे शोषण केले. हा प्रकार उघडकीस आल्यावर सिटीचौक पोलीस ठाण्यात बाल कल्याण समितीच्या अहवालानंतर गुन्हा दाखल नोंदविण्यात आला. याप्रकरणी भारती रगडे आणि तिचा प्रियकर विक्की ऊर्फ आयुष विजय मगरे यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणात एकूण बारा जणांचा समावेश असल्याचे माजी प्राचार्यांच्या मुलाचा व पुतण्याचा दावा आहे. माजी प्राचार्यांची फुलंब्री तालुक्यातील लहाण्याची वाडी येथील गट क्र. १०७ व ९२, नारळी बाग येथील सिटी सर्व्हे क्र. २९४० व बेगमपुरा येथील खुशबू हाऊसिंग सोसायटीतील स्थायी संपत्ती भूमाफियांनी गिळंकृत केली आहे. त्याचे खरेदीखत करून कोणत्याही प्रकारची रक्कम न देता फक्त बेनामी खरेदीखत करत फसवणूक केली. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत करण्यात यावा. 

या प्रकरणात भारती रगडे, विक्की मगरे यांच्यासोबतच सय्यद वाहेद सय्यद अमीर (रा. शंभूनगर, गारखेडा परिसर), शेख मोहम्मद शेख मुस्ताक (रा. गणेश कॉलनी), योगेश उत्तमराव पाथ्रीकर (रा. पार्थी, ता. फुलंब्री), विष्णू रंगनाथ काकडे (रा. वाघलगांव, ता.फुलंब्री), अब्दुल हकीम अब्दुल हमीद मोमीन (रा. छत्रपती चौक, एन-१२, सिडको), अकिल भिकन शेख (रा. टिळकनगर, सिल्लोड), रोशन किसन औसरमल (रा. डोंगरगाव कवाड, ता. फुलंब्री), आप्पासाहेब शिवाजी साबळे (रा. गेवराई पायगा, ता. फुलंब्री), बालाजी गणपत हेंबारे (रा. घर क्र. १२४, एन-२) आणि नाथा सुपडू काकडे (रा. वाघला, ता. फुलंब्री) यांचीदेखील चौकशी करण्याची मागणी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Ex-principal's second wife exploits minor child; sells property worth Rs 10 crore to each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.