अतिवृष्टीच्या नुकसानीचे निकष ठरेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:03 AM2021-09-14T04:03:57+5:302021-09-14T04:03:57+5:30
सोयगाव : जिल्हाभरात अतिवृष्टी होऊन आठवडा उलटला तरीही अद्यापही बाधित क्षेत्राची आकडेवारी जुळवाजुळव करण्यातच जिल्हा प्रशासन गुंतले आहे. अद्यापही ...
सोयगाव : जिल्हाभरात अतिवृष्टी होऊन आठवडा उलटला तरीही अद्यापही बाधित क्षेत्राची आकडेवारी जुळवाजुळव करण्यातच जिल्हा प्रशासन गुंतले आहे. अद्यापही नुकसानीचा निकष ठरत नसल्याने जिल्ह्यासाठी मिळणारी अतिवृष्टीची मदत रखडली आहे.
जिल्हाभरात आठवड्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यात खरिपाचे मोठे नुकसान झालेले आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हाभरात नुकसानीची पाहणी पूर्ण केली. परंतु अद्याप जिल्ह्याची नुकसानीची आकडेवारी जुळवाजुळवीचेच काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे संथगतीने सुरू आहेत. शासनाकडून अद्यापही नुकसानीच्या भरपाईसाठी हेक्टरी मदत घोषित करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या स्थानिक पातळीवर मदतीच्या निकषासाठी एकमत होत नसल्याने नुकसानभरपाईच्या मदतीसाठी अद्यापही निकष ठरत नाही. परंतु पंचनामे कोणत्या आधारावर करण्यात येत आहे, याबाबत शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.
------
दोन हेक्टरची मर्यादा
अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करताना दोन हेक्टरचीच मर्यादा घालून दिलेली असल्याने या नुकसानीसाठी एनडीआरएफचाच निकष ग्राह्य धरण्यात येत असल्याचे पंचनाम्यांच्या हालचालीवरून उघड झाले आहे. या निकषात कोरडवाहू क्षेत्रासाठी ६,८०० व बागायतीसाठी १२,५०० रुपये मदत मिळते, तर ज्वारी, बाजरी आणि भाजीपाल्यासाठी कोणता निकष लावला जाणार आहेत. याचा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
130921\img-20210912-wa0127.jpg
सोयगाव-सोयगाव तालुक्यात झालेले नुकसान