औरंगाबाद तालुक्यात अतिवृष्टी, तलावांच्या जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:02 AM2021-09-09T04:02:12+5:302021-09-09T04:02:12+5:30

विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे लामकाना येथे कृष्णा आसाराम बारबैले यांच्या गोठ्याची भिंत पडून तीन शेळ्या दगावल्या, तर गोलटगाव ...

Excessive rainfall in Aurangabad taluka, increase in water storage of lakes | औरंगाबाद तालुक्यात अतिवृष्टी, तलावांच्या जलसाठ्यात वाढ

औरंगाबाद तालुक्यात अतिवृष्टी, तलावांच्या जलसाठ्यात वाढ

googlenewsNext

विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे लामकाना येथे कृष्णा आसाराम बारबैले यांच्या गोठ्याची भिंत पडून तीन शेळ्या दगावल्या, तर गोलटगाव येथील मशिदीवर वीज पडल्याने इमारतीचे नुकसान झाले. हिवरा येथील सांडू पोफळे यांच्या गोठ्याची भिंत कोसळली. शिवाय खरीप पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल विभाग व कृषी खाते यांनी पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून भीजपाऊस पडल्याने जलाशय अद्याप कोरडेठाकच होते; परंतु सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील जलाशयांची पाणी पातळी वाढली आहे. औरंगाबाद तालुक्यात आता सरासरीच्या ९५ टक्के पावसाची नोंद झाली.

-----

तालुक्यात मंडळनिहाय झालेला पाऊस, (कंसात मिमी.) समावेश आहे. औरंगाबाद (१०७), उस्मानपुरा (१०७), भावसिंगपुरा (११२), कांचनवाडी (९६), चौका (५५), लाडसावंगी (५५), वरूडकाजी (११०), करमाड (९०), चिकलठाणा (११९), चित्तेपिंपळगाव (११८) पाऊस झाला.

---

आजचा एकूण पाऊस : ९६९.०० मिमी.

आजची सरासरी : ९६.९० मिमी.

आजपर्यंतची पावसाची एकूण सरासरी : ६४२

----

फोटो : औरंगाबाद तालुक्यातील हिवरा येथे अशा प्रकारे म्हशीच्या गोठ्याची भिंत कोसळली.

Web Title: Excessive rainfall in Aurangabad taluka, increase in water storage of lakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.